आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ग्रामस्थांनी लावले शाळेला टाळे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नेवासे- एकेकाळी आदर्श शाळा म्हणून नावलौकिक मिळवलेल्या नजीक चिंचोली येथील जिल्हा परिषदेच्या शाळेला अनेकवेळा मागणी करूनही शिक्षक न मिळाल्याने शुक्रवारी ग्रामस्थांनी कुलूप लावले. चौथीपर्यंतच्या वर्गांना गेल्या वर्षभरापासून एकच शिक्षिका शिकवत होती.
नजीक चिंचोली येथील धाडगेवस्ती शाळेने तीन वर्षांपूर्वी जिल्ह्यात दर्जेदार शाळा म्हणून नाव मिळवले होते. त्यावेळचे शिक्षक कल्याण नेहूल यांनी स्वत:च्या नावे कर्ज घेऊन पदरमोड करत इतर नागरिकांच्या साहाय्याने शाळेचे बांधकाम रंगरंगोटी करून एक आदर्श दाखवून दिला होता. ८० विद्यार्थ्यांच्या आसपास संख्या असलेल्या या शाळेला वर्षभरापासून तेथे एकच शिक्षिका सर्व जबाबदाऱ्या पार पाडत पहिली ते चौथीपर्यंत शाळा विद्यादानाचे काम करत होत्या. प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराचा फटका मुलांना बसून त्यांच्या अभ्यासावर याचा परिणाम जाणवू लागल्याने अनेक पालकांनी मुले शाळेतून काढून घेण्याची तयारी चालवली होती. एक मे रोजी ग्रामसभेत ठराव घेऊन शाळा चालू झाल्यानंतर शिक्षक मिळाले नाही, तर शाळेला कुलूप लावण्याचा निर्णय घेऊन शिक्षण विभागाला कळवला होता. शाळा चालू झाल्यानंतर दोन दिवसांत शिक्षक देण्याचे मान्य केले गेले. मात्र, शिक्षक आल्याने शुक्रवारी सरपंच अॅड. बन्सी सातपुते, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष कैलास धाडगे, पांडुरंग धाडगे आदींनी शाळेला कुलूप लावले.
बातम्या आणखी आहेत...