आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विनोद कदम अखेर सापडला; गुन्हे शाखेची नाशिकमध्ये कारवाई

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- महापालिकेत नोकरी देण्याचे आमिष दाखवून बलात्कार केल्याप्रकरणी माजी नगरसेवक विनोद कदम याला पकडण्यात पोलिसांना बुधवारी यश आले. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने नाशिकमध्ये त्याच्या मुसक्या आवळल्या.नोकरीच्या आमिषाने वारंवार बलात्कार केल्याच्या पीडित महिलेच्या तक्रारीवरून कदमविरूद्ध नगर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्यापासून तो फरार होता. पीडित महिलेने त्याच्या अटकेसाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती. निर्णय देताना खंडपीठाने विशेष पथक स्थापन करून कदमला अटक करण्याचे आदेश पोलिस अधीक्षकांना दिले. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पथक स्थापन करून विनोदचा शोध सुरू होता. बुधवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास त्याला नाशिक येथील आडगाव रस्त्यावरील लक्ष्मीरोड परिसरातील एका बंगल्यातून ताब्यात घेण्यात आले. गेल्या सहा महिन्यांपासून पोलिसांच्या हातावर तुरी देण्यात यशस्वी ठरलेला कदम शेवटी पोलिसांच्या सापळ्यात अडकला. पोलिस निरीक्षक गोरख शेळके, कर्मचारी मन्सूर सय्यद, प्रसाद भिंगारदिवे, जोसेफ साळवी यांच्या पथकाने ही कारवाई केली.