आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काँग्रेसने पोसलेल्या भ्रष्टाचार, अत्याचाराच्या रावणाचे दहन करू

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- काँग्रेसच्या राज्यात, देशात सर्वत्र मोठय़ा प्रमाणात अनिष्ट प्रवृत्तींना खतपाणी घातले जात आहे. काँग्रेसने पोसलेल्या भ्रष्टाचार, अत्याचाराच्या या रावणास सर्व मिळून दहन करू, असे प्रतिपादन विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांनी रविवारी (13 ऑक्टोबर) केले.

विजयादशमीनिमित्त भाजपच्या सर्जेपुरा व लालटाकी शाखेच्या वतीने वीस फुटी रावणाचे दहन तावडे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी खासदार दिलीप गांधी, जिल्हाध्यक्ष प्रताप ढाकणे, आमदार राम शिंदे, शहर जिल्हाध्यक्ष अभय आगरकर, गुलशन धुप्पड, सुनील रामदासी, मालन ढोणे, सुरेखा विद्ये, सुवेंद्र गांधी, अनिल गट्टाणी, अजय पंजाबी आदी उपस्थित होते.

तावडे म्हणाले, दसर्‍याच्या मुहूर्तावर रावण दहन करून आपण समाजातील अनिष्ट प्रवृत्तींचा नाश करतो. देशातील, राज्यातील व शहरातील अपप्रवृत्ती संपवण्यासाठीची जबाबदारी भाजपवर सोपवा. 2014 मध्ये होणार्‍या लोकसभा व विधानसभा निवडणुकीसाठी भाजपच्या मागे उभे राहून नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करा. यावेळी विविध पक्षांतील कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनंत जोशी यांनी, तर आभार राम वडागळे यांनी मानले.