आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Vinod Tawade News In Marathi, BJP, Ram Shinde, Dilip Gandhi, Divya Marathi

..तर आमदार शिंदेंना लाल दिव्याची गाडी, विनोद तावडे यांचे सभेत आश्वासन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जामखेड - महायुतीचे उमेदवार दिलीप गांधी यांना विजयी केल्यास कर्जत-जामखेडचे आमदार राम शिंदे यांना लाल दिव्याची गाडी देऊ, असे आश्वासन विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांनी सोमवारी दिले.
महायुतीच्या प्रचारार्थ तावडे यांची बाजारतळावर सभा झाली. यावेळी खासदार गांधी, आमदार शिंदे, सभापती डॉ. भगवान मुरूमकर आदी उपस्थित होते. तावडे म्हणाले, राज्यात काँग्रेस आघाडीने 3 लाख कोटींचे कर्ज केले. ते पैसे कुठे गेले याचा हिशेब द्या. 15 वर्षांपासून केवळ घोटाळे करून अजित पवारांनी महाराष्ट्र लुटायचे काम केले. खोटी आश्वासने देऊन जनतेला भुलवण्याचे काम काँग्रेस आघाडीने केले.

2004 मध्ये मोफत वीज देतो म्हणाले, परंतु दिली नाही. मराठा समाजाला आरक्षण देतो म्हणाले, अद्याप दिले नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक करतो म्हणाले, अद्याप केले नाही. राज्यात महायुतीचे सरकार आल्यानंतर जामखेड तालुक्याला पाणी देण्याचे काम करू, असे त्यांनी सांगितले.आमदार शिंदे म्हणाले, प्रत्येक निवडणुकीत अजित पवार पाण्याच्या प्रश्‍नासंदर्भात येथील मतदारांना वेठीला धरतात. भुतवडा जोडतलाव व अमृतलिंग तलावासाठी निधी दिला जात नाही. त्यामुळे जनताच आता त्यांना पाणी पाजणार आहे.