आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आघाडी, युती तोडणे हा राष्ट्रवादी, भाजपचा छुपा अजेंडा, विश्वजित कदम यांचा आरोप

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- विधानसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादीने आघाडी तोडली. बहुदा राष्ट्रवादी व भाजपचा हा छुपा अजेंडा असू शकतो, असा आरोप काँग्रेसचे प्रदेश युवाध्यक्ष विश्वजित कदम यांनी पत्रकार परिषदेत केला.कदम म्हणाले, सोशल मीडियाचा वापर करून लोकसभा निवडणुकीत लाट निर्माण करण्यात आली, पण विधानसभेची निवडणूक वेगळी आहे. राज्यात आघाडीचे सरकार असताना अनेक योजना आणल्या. त्याचा जनतेला फायदा होत आहे. त्यामुळे राज्यात मोदींची लाट नाही. युती तुटल्यानंतर शरद पवार यांनी लगेच आघाडी तोडली. भाजप व राष्ट्रवादीचा हा छुपा अजेंडा असू शकतो, असे कदम म्हणाले.

युवक काँग्रेसचे जाळे राज्यात सर्वत्र असून पक्षाने 18 युवकांना यावेळी संधी दिली आहे. राज्यात आमच्या 140 जागा निवडून येतील. आमची लढत राष्ट्रवादीशी नाही, तर शिवसेना व भाजपशी आहे. राज्य सरकारने केलेली कामे व योजना आम्ही जनतेपर्यंत पोहोचवत असून त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे, असे कदम म्हणाले. यावेळी उमेदवार सत्यजित तांबे उपस्थित होते.