आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कपड्यांवर विविध घोषवाक्ये लिहून घेतला मतदार जागृतीचा वसा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- लोकशाहीत निवडणूक प्रक्रियेला विशेष महत्त्व आहे. प्रत्येकाने आपला मतदानाचा हक्क बजवावा असा पुणे येथील बापूराव गुंड यांचा आग्रह आहे. त्यासाठी त्यांनी अंगावरील कपड्यांवर मतदार जागृतीची घोषवाक्ये लिहिली आहेत. राज्यभर जनजागृतीसाठी त्यांनी शनिवारी विशाल गणपतीचे दर्शन घेऊन सुरुवात केली.
पुण्यात कापडांचा व्यवसाय करणार्‍या गुंड यांचा पत्नी मीरा, दोन मुले असा परिवार आहे. मुलगी इंजिनिअरिंगला आहे, तर मुलगा नववीत शिक्षण घेत आहे. तोकड्या उत्पन्नात संसार चालवणे कठीण झाले. त्यांच्या पत्नी मीरा बचतगट चालवून संसाराला हातभर लावतात. जनहितासाठी अनेक वर्षांपासून गुंड पर्शिम घेतात. पत्नी मीरा यांनी बापुरावांच्या कार्याला विरोध करून संसारात लक्ष देण्यासाठी समजावले. मात्र, समाजात परिवर्तन घडेल, या आशेवर कुटुंबीयांचा विरोध झुगारून त्यांचे कार्य सुरूच आहे. चारित्र्यवान प्रतिनिधी निवडून देण्याची प्रत्येकाचीच जबाबदारी आहे; पण अनेकजण मतदानाचा हक्क बजावत नसल्याची खंत गुंड यांना आहे. यापार्श्वभूमीवर शनिवारी नगरचे ग्रामदैवत विशाल गणपतीचे दर्शन घेऊन मोटारसायकलवरून जनजागृती सुरू केली. टोपीवर, कपड्यांवर ‘मतदानाचा हक्क बजावा’ हे घोषवाक्य लिहिले आहे. राज्यभर ते फिरणार आहेत. यासाठी त्यांना दीड लाख रुपये खर्च येणार आहे. त्यांना नागरिकांकडूनही मदतीची अपेक्षा आहे.