आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नगर जिल्ह्यात 28 हजार 831 मतदार वाढले

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - ऑक्टोबर 2011 मध्ये प्रसिद्ध झालेल्या यादीनुसार जिल्ह्यात एकूण 29 लाख 49 हजार 960 मतदार होते. स्थलांतरित, मृत 36 हजार 939 मतदार वगळता 28 हजार 831 मतदारांची वाढ होऊन आता ही संख्या 29 लाख 78 हजार 791 झाली आहे. नव्याने तयार करण्यात आलेल्या मतदारयाद्यांमध्ये 0.98 टक्के वाढ झाली आहे. 5 ते 15 जानेवारीदरम्यान नव्याने 401 मतदारांची नोंदणी झाली असल्याची माहिती प्रभारी जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.
‘मतदार दिना’निमित्त 25 जानेवारीला जिल्ह्यात विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. 5 ते 15 जानेवारीदरम्यान नोेंदणी केलेल्या नवीन मतदारांना त्या दिवशी मतदान ओळखपत्र देण्यात येईल. हा कार्यक्रम नियोजन भवन येथे होणार आहे. मतदार जागृतीसाठी शाळा, महाविद्यालयांत घोषवाक्य, सायकल रॅली, प्रभात फेरी, निबंध स्पर्धा, पथनाट्य यांचे आयोजन करण्यात येणार आहे. यामध्ये विविध स्वयंसेवी संस्थांबरोबरच महिला मंडळे, बचत गट सहभागी होणार आहेत.
विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत ऑक्टोबर 2011 ते 1 जानेवारी 2012 पर्यंत प्रसिद्ध केलेल्या प्रारूप यादीवर दावे व हरकती मागवण्यात आल्या होत्या. अंतिम प्रारूप यादीत मृत व स्थलांतरित वगळता सुमारे 0.98 टक्के मतदार संख्या वाढली असल्याचे जगताप यांनी सांगितले. उपजिल्हा निवडणूक अधिकारी सुनील माळी यावेळी उपस्थित होते.
दैनंदिन खर्चाचा हिशेब आवश्यक - जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुकांचे नामनिर्देशन पत्र भरताना शौचालय असल्याचे ग्रामसेवकाचे प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे. अर्ज भरल्यापासून दुस-या दिवशी दोन वाजेपर्यंत दैनंदिन खर्चाचा हिशेब देणे आवश्यक आहे; अन्यथा उमेदवारास पुढील पाच वर्षांसाठी अपात्र ठरवले जाईल. - नितीन गावंडे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी.