आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Voter Public Awareness Day Rally In Five Hundred Youth

मतदार दिन जनजागृती रॅलीमध्ये पाचशे युवक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर-राष्ट्रीय मतदारदिनाचे औचित्य साधून शनिवारी सकाळी शहरातून सुमारे पाचशे शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची मतदार जनजागृती फेरी निघाली. यावेळी विद्यार्थ्यांनी मतदानाविषयी जनजागृती केली.
वाडिया पार्क येथील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यापासून सकाळी प्रभातफेरी निघाली. जिल्हाधिकारी डॉ. संजीवकुमार यांनी हिरवा झेंडा दाखवून फेरीचा प्रारंभ केला. यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी रवींद्र जगताप, उपजिल्हा निवडणूक अधिकारी सुनील माळी, नगरचे उपविभागीय अधिकारी राजेंद्र पाटील, तहसीलदार राजेंद्र थोटे, उपशिक्षणाधिकारी शिवाजी शिंदे, क्रीडाधिकारी भाऊराव वीर आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी म्हणाले, लोकशाहीत मतदार हा महत्त्वाचा घटक असल्याने 18 वर्षे वयावरील सर्वांची नावे मतदार यादीत असावी. सर्वांनी मतदार नोंदणी करून घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले. रॅलीची वाडिया पार्क येथे सांगता झाली. या फेरीत शहरातील न्यू आर्टस् कॉर्मस अँड सायन्स कॉलेज, रेसिडेन्शिअल हायस्कूल, भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूल, रूपीबाई बोरा ज्युनिअर कॉलेज, सारडा महाविद्यालय, राधाबाई काळे महिला महाविद्यालय, वारे ज्युनिअर कॉलेज, औद्योगिक प्रशिक्षण संस्था आदी शाळा कॉलेजचे सुमारे 500 विद्यार्थी -विद्यार्थिनी सहभागी झाले.सकाळी अकरा वाजता जिल्हाधिकार्‍यांच्या हस्ते मतदारांना ओळखपत्र वाटप करण्यात आले.