आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Voters Excit In Shegaon City, 20 Thousand 246 Voters Exercise Rights

शेवगाव शहरात मतदारांमध्ये उत्साह, २० हजार २४६ मतदारांनी केले शांततेत मतदान

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शेवगाव - नगरपरिषद निवडणुकीसाठी रविवारी २५ हजार २४५ पैकी २० हजार २४६ नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावला. १० हजार ६५९ पुरूष, तर हजार ५८७ स्री मतदारांनी मतदान केले. सर्वाधिक मतदान प्रभाग मध्ये ९१.८८ टक्के, तर सर्वाधिक कमी ७२.२७ टक्के प्रभाग १० मध्ये झाले. एकूण ७९.६३ टक्के मतदान झाले.

२१ प्रभागांत १२१ उमेदवार उभे होते. त्यांचे भवितव्य सोमवारी मतमोजणीनंतरच स्पष्ट होईल. मतदारांमध्ये उत्साह दिसत होता. सकाळी मतदानाचा वेग कमी होता. पहिल्या दोन तासांत अवघे १३ टक्के मतदान झाले. दुपारी १२ पर्यंत ३२ टक्के मतदान झाले. दोनपर्यंत ५२ टक्के मतदान झाले. साडेतीनपर्यंत ७० टक्के मतदान झाले. शेवटच्या दोन तासांत १० टक्के मतदान वाढून एकूण ७९.६६ टक्के मतदान झाले.

कुठलाही गोंधळ शाब्दिक चकमकी होता मतदान शांततेत पार पडले. पोलिस उपअधीक्षक दत्तात्रेय कांबळे, निरीक्षक सुरेश सपकाळे आदींच्या मार्गदर्शनाखाली बंदोबस्त तैनात होता. उमेदवारांची संख्या जास्त असतानाही भांडण किंवा तंटे होण्याची इतिहासातील ही पहिलीच वेळ होती.