आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Voting On 28 February For District Teachers Bank

जिल्हा शिक्षक बँकेसाठी २८ फेब्रुवारीला मतदान

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेच्या २१ जागांच्या निवडणुकीचे वेध गुरुजींना लागले अाहेत. सोमवारी (२५ जानेवारी) निवडणूक कार्यक्रम जाहीर होणार आहे. २८ फेब्रुवारीला मतदान होऊन २९ फेब्रुवारीला मतमोजणी होईल.
राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण, तसेच जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी, राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाच्या मान्यतेने जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेच्या निवडणुकीतील टप्पे जाहीर करण्यात आले आहेत. २५ जानेवारीला अधिकृतरित्या कार्यक्रम जाहीर होईल, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांकडून समजली. सोमवारपासून (२५ जानेवारी) नामनिर्देशनपत्र २९ जानेवारीपर्यंत दाखल करता येणार आहेत. ३० जानेवारीला आलेल्या अर्जांवर छाननी होईल. १५ फेब्रुवारीपर्यंत माघारीची मुदत आहे. १६ फेब्रुवारीला अंतिम यादी जाहीर करून चिन्हवाटप केले जाईल. २८ फेब्रुवारीला मतदान, तर २९ फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे. निवडणुकीसाठी सर्व तालुक्यातून प्रत्येकी प्रमाणे १४ जागा, महापालिका, नगरपालिका, भिंगार कँन्टोन्मेंट नॉन टिचिंग प्रवर्गातून २, अनुसूचित जाती, जमाती १, महिला प्रतिनिधी २, इतर मागास प्रवर्गातून १, भटक्या जाती, जमाती विशेष मागास प्रवर्गातून अशा २१ जागांसाठी ही निवडणूक होणार आहे.