आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दलित व कम्युनिस्ट एकत्र आल्यास देशात क्रांती - वृंदा करात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- देशातील जाती प्रथेचे जोखड जोपर्यंत दूर होत नाही, तोपर्यंत देश महासत्ता होणार नाही. दलित आणि कम्युनिस्ट एकत्र आल्यास या देशात क्रांती घडू शकते, असा विश्वास मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या (माकप) पॉलिट ब्युरो सदस्य खासदार वृंदा करात यांनी बुधवारी व्यक्त केला.

राज्यातील वाढत्या दलित अन्याय अत्याचाराच्या पार्श्वभूमीवर दलित आदिवासी अधिकार आंदोलन व इतर सामाजिक संघटनांतर्फे 22 ते 28 मे दरम्यान पुणे येथील ‘महात्मा फुले वाडा ते खर्डा’ अशी सद्भावना रॅली काढण्यात आली.

बुधवारी खर्डा येथे खर्डा संसद’ भरवून या सद्भावना रॅलीचा समारोप करण्यात आला. यावेळी खासदार करात बोलत होत्या. यावेळी माजी गृहमंत्री तथा सामाजिक कार्यकर्ते भाई वैद्य, र्शमिक मुक्ती दलाचे भारत पाटणकर, कॉम्रेड किरण मोघे, मंगल खिंवसरा, माकपचे राज्य सचिव मंडळ सदस्य अजित अभ्यंकर, प्रियदश्री तेलंग, कॉम्रेड मिलिंद सहस्त्रबुद्धे, अँड. संजय दाभाडे, वसंत साळवे, विलास वाघ, मनीषा तोकल, लोकाधिकार आंदोलनाचे अध्यक्ष अँड. अरुण जाधव, दलित आदिवासी अधिकार आंदोलनाचे समन्वयक डॉ. नितीश नवसागरे, बेला भाटिया, सुनील दुधे, गेल आम्वेट, युवराज माहिते, सुशीला मोराळे, संभाजी बोराडे आदी उपस्थित होते.

करात म्हणाल्या, नितीन आगे या दलित युवकाची हत्या म्हणजे देशाच्या संविधानाची आणि कायद्याची हत्या आहे. आगे कुटुंबाचा एकुलता एक मुलगा अकाली जाणे हा त्यांच्यासाठी मोठा आघात आहे. ही वेळ त्यांच्यावर येणे म्हणजे देशात जातीव्यवस्था आजही नष्ट झाली नसल्याचे स्पष्ट होत आहे. वर्ग, जाती, लिंग भेदविरुद्ध समाजाची सध्या गरज आहे. खर्डा घटनेतील मुलीस भेटायचे होते, परंतु तिला भेटू दिले नसल्याचे त्यांनी सांगितले.

या संसदेत दलित आदिवासी अधिकार आंदोलन, महाराष्ट्र लोकअधिकार आंदोलन, भारत मुक्ती मोर्चा, ग्रामीण विकास केंद्र, भाकप, एलटीडी, भटके विमुक्त संघटना, आदिवासी विकास आघाडी, कास्ट्राईब संघटना, भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलन, आम आदमी पक्ष आदी संघटना सहभागी झाल्या होत्या. दरम्यान, ‘खर्डा संसदे’च्या व्यासपीठावर आगे दाम्पत्य उपस्थित होते. यावेळी राजू आगे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी त्यांनी नितीन याच्या शवविच्छेदनाच्या अहवालाबाबत शंका उपस्थित केली. या अहवालामध्ये त्रुटी असल्याचे सांगून त्रुटी भरून काढण्याची त्यांनी यावेळी मागणी केली.

अठरा ठराव मंजूर
खर्डा संसदेत विविध मागण्यांचे 18 ठराव मंजूर करण्यात आले. यात दलित, आदिवासी, भटके विमुक्त व अल्पसंख्याक यांच्यावरील होणारे अन्याय, अत्याचार रोखण्यास महाराष्ट्र सरकार अपयशी ठरले आहे. म्हणून खर्डा संसदेत शासनाचा निषेध करण्यात आला. या ठरावामध्ये घटनाबाह्य असलेली महात्मा गांधी तंटामुक्त समिती बरखास्त करण्यात यावी, या व अन्य मागण्यांचा ठराव करण्यात आला.
सद्भावना रॅली