आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Vsl Fraud Case, Rahul Aabane Arrested Bye Police

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

राहुल आबने दौंड पोलिसांच्या ताब्यात; ‘व्हीएसएल’ फसवणूक प्रकरण

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर: वेध सेक्रेड लाईफ मल्टिट्रेड कंपनीच्या माध्यमातून जिल्ह्यातील 9 हजार गुंतवणूकदारांना 15 कोटींचा गंडा घातल्याच्या प्रकरणातील मुख्य आरोपी राहुल आबने याला मंगळवारी दौंड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. अन्य आरोपी कन्हैया कासार व प्रमोद बडे यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली.
मल्टिलेव्हल मार्केटिंग व मनी सक्र्युलेशन स्कीमचा फंडा वापरून ही कंपनी फसवणूक करीत होती. गुंतवणूकदार डॉ. परवेज शेख यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी राहुल आबने (दौंड), कन्हैया मधुकर कासार (शेवगाव) व डॉ. प्रमोद र्शीधर बडे यांना अटक केली. या तिघांच्याही पोलिस कोठडीची मुदत संपल्याने मंगळवारी त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. पोलिसांच्या वतीने त्यांच्या पोलिस कोठडीत वाढ करण्याची विनंती करण्यात आली.
आबने याने फसवून मिळालेल्या पैशांतून बायकोसाठी सोने विकत घेतल्याचे, तसेच अनेक बँकांमध्ये त्याचे खाते असल्याचे तपासात पुढे आले. त्याची बायको तिचे वडील व भावासह फरारी आहे. तिच्याकडे असलेले सोने हस्तगत करण्यात पोलिसांना अजून यश आलेले नाही. सुरुवातीला कंपनीने 12 हजार व नंतर 24 हजार रुपयांची योजना राबवली. गुंतवणूकदारांना दिलेले धनादेश न वटता परत आले. त्यामुळे बँकांनी दंड ठोठावला आहे. कंपनीच्या संकेतस्थळावरून पोलिसांना बरीच माहिती मिळाली. गुंतवणूकदारांची संख्या मोठी असल्याने फसवणूक झालेल्यांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. एकूणच गुन्ह्याची व्याप्ती पाहता आरोपींना पोलिस कोठडी द्यावी, असा युक्तिवाद सरकारी वकिलांनी केला. न्यायालयाने तिघांनाही न्यायालयीन कोठडी सुनावली.
दरम्यान, नगरमध्ये गुन्हा दाखल झाल्यानंतर आबने याच्याविरुद्ध दौंड पोलिस ठाण्यातही फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला. त्या गुन्ह्यात त्याला अटक करण्यासाठी दौंडचे पथक नगरला आले होते. दौंडला दाखल गुन्ह्यात त्याला हस्तांतरित करण्यात आले. याप्रकरणाच्या तपासाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.