आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वांबोरी चारीच्या नशिबी यंदाही कोरडेपण; लाभक्षेत्रातील १०२ तलाव रिकामे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - नेवासे,नगर, राहुरी पाथर्डी तालुक्यातील ४३ गावांना वरदान ठरलेली वांबोरी चारी याहीवर्षी कोरडीच राहणार आहे. मुळा धरणातून जायकवाडीला पाणी सोडण्यात येत असल्याने चारीचा फूटव्हॉल्व्ह उघडा पडणार आहे. ही योजना चालवण्यासाठी सुमारे सव्वा कोटी खर्च येतो. पण शासनाकडून निधी उपलब्ध झाला नाही. मागील वर्षीपासून बंद पडलेले ट्रान्सफाॅर्मर निधीअभावी दुरुस्त होऊ शकले नाहीत.
निधीसाठी पाटबंधारे विभागाने वारंवार प्रस्ताव पाठवले, पण उदासीन शासनाने तोंडाला पाने पुसली. या चारीसाठी ६८० दशलक्ष घनफूट पाण्याची गरज असते. मुळातून जायकवाडीला पाणी सोडण्यापूर्वीच चारीचे पाणी आरक्षित करून कोर्टात धाव घेणे अपेक्षित होते. पण कोणीही पुढाकार घेतल्याने चारी लाभक्षेत्रातील १०२ पाझर तलाव कोरडेच राहणार आहेत.