आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

त्या वॉचमनचा खून आतेभावांनीच केला, दोन्ही आरोपींच्या मुसक्या आवळल्या

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- बुऱ्हाणनगर येथील शेतात मंगळवारी झालेल्या खुनाचे गूढ अवघ्या २४ तासांच्या आत उकलण्यात एमआयडीसी पोलिसांना यश आले. लक्ष्मण वसंत गायकवाड (बोल्हेगाव, मनमाड रस्ता) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. लक्ष्मणच्या दोन्ही आतेभावांनीच त्याचा खून केल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले.
नगर ग्रामीणचे उपअधीक्षक आनंद भोईटे एमआयडीसीचे सहायक निरीक्षक राहुलकुमार पवार आणि सहकाऱ्यांनी या प्रकरणात दोघांना अटक केली. संदीप भानुदास गुंजाळ दीपक रमेश कुऱ्हाडे (घोडेगाव, ता. नेवासे) अशी त्यांची नावे आहेत. हे दोघेही मृत लक्ष्मणचे आतेभाऊ आहेत.
मंगळवारी सकाळी बुऱ्हाणनगर परिसरात एका व्यावसायिकाच्या शेतात ४० वर्षांच्या व्यक्तीचा मृतदेह आढळला. ही माहिती समजताच सहायक निरीक्षक राहुलकुमार पवार सहकारी तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. मृतदेहाच्या अंगावर जांभळा शर्ट चॉकलेटी रंगाची पँट होती. त्याच्या हातावर लक्ष्मण एस. असे गाेंदलेले होते. डोक्यावर कपाळावर धारदार शस्त्राने वार करून त्याचा खून केल्याचे स्पष्ट दिसत होते. मृतदेहानजीक काही मादक द्रव्येही पोलिसांना मिळाली. सायंकाळपर्यंत मृतदेहाची ओळख पटलेली नव्हती. हा मृतदेह लक्ष्मण वसंत गायकवाड याचा असल्याचे रात्री निष्पन्न झाले.

पोलिस उपअधीक्षक आनंद भोईटे यांनीही घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पोलिसांनी दिवसभर संपूर्ण परिसर पिंजून काढला. सायंकाळी बुऱ्हाणनगरचे कुंडलिक काशिनाथ तोडमल यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एमआयडीसी ठाण्यात अज्ञात आरोपींविरुद्ध खुनाचा गुन्हा नोंदवण्यात आला. वेगाने केलेली चौकशी तपासात दोन व्यक्तींबाबत पोलिसांचा संशय बळावला. मंगळवारी रात्री उशिरा पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले. सहायक निरीक्षक पवार यांच्यासह सहायक फौजदार शेख, मणिकेरी, नाकाडे, खंडागळे, खंडागळे, पंदरकर यांच्या पथकाने ही कारवाई केली.

गुन्हेगारी पार्श्वभूमी
पोलिसांनीअटक केलेल्या संदीप भानुदास गुंजाळ दीपक रमेश कुऱ्हाडे या दोन्ही आरोपींची पार्श्वभूमी गुन्हेगारी प्रवृत्तीची आहे. दीपकला काही महिन्यांपूर्वी पत्नीचा खून केल्याच्या गुन्ह्यात शिक्षा झाली होती. येरवड्यात शिक्षा भोगून तो बाहेर आला होता. दुसरा आतेभाऊ संदीपही गुन्हेगारी प्रवृत्तीचा असल्याचे पोलिस चौकशीत समोर अाले. या दोघांनी लक्ष्मणला सोमवारी रात्री बोलावून घेतले होते. रात्रीच त्यांनी लक्ष्मणचा खून झाला. प्राथमिक चौकशीत हा खून कौटुंबिक वादातून झाल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. अधिक चौकशीनंतर नेमके कारण समोर येईल, असे पोलिसांनी सांगितले.

अन् संशय बळावला
लक्ष्मणगायकवाड हा बोल्हेगावचा रहिवासी आहे. काही दिवसांपासून सावेडीतील प्रोफेसर कॉलनी परिसरातील एका बांधकाम साईटवर तो वॉचमन म्हणून काम करत होता. पत्नीसह तो तेथेच रहात होता. त्याचा मृतदेह सापडला तेथून अवघ्या ५०० मीटर अंतरावर आतेभाऊ संदीप राहतो तेथे. मृतदेह सापडल्याची वार्ता समजताच दिवसभर घटनास्थळी अनेक नागरिकांनी गर्दी केली. पण संदीप मात्र तिकडे फिरकलाच नाही. त्यामुळे त्याच्यावर पोलिसांचा संशय बळावला. त्याला ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता आदल्या दिवशी रात्री तो लक्ष्मणसमवेत असल्याचे निष्पन्न झाले.