आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निर्जंतुकीकरणाकडे ४७ गावांचे दुर्लक्ष,ब्लिचिंग पावडरमध्ये क्लोरिनचे प्रमाण २० टक्क्यांपेक्षा कमी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - जिल्ह्यातीलनागरिकांना स्वच्छ निर्जंतुकीकरण करुनच पाणी पुरवण्यासाठी आरोग्य विभागाकडून ग्रामपंचायतींना वेळोवेळी सूचना दिल्या जातात. तथापि, ४७ ग्रामपंचायतींच्या हलगर्जीपणामुळे निर्जंतुकीकरणासाठी वापरल्या जाणाऱ्या ब्लिचिंग पावडरमध्ये क्लोरिनचे प्रमाण २० टक्क्यांपेक्षा कमी असल्याचे आढळून आले. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना दूषित पाणी प्यावे लागत आहे.

पिण्याचे स्वच्छ निर्जंतुकीकरण करण्याची जबाबदारी ग्रामपंचायतींची आहे. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत वेळोवेळी पाण्याच्या नमुन्यांची, तसेच ब्लिचिंग पावडरची तपासणी केली जाते. जिल्ह्यात एप्रिलपासून हजार ६३७ गावांमधील पाणी नमुने दूषित आढळून आले. ४०६ ग्रामपंचायतींच्या ब्लिचिंग पावडरच्या नमुन्यांमधील क्लोरिनचे प्रमाण २० टक्क्यांपेक्षा कमी आढळून आले. त्यामुळे लाखो नागरिकांना दूषित पाणी प्यावे लागत आहे.
दूषित पाण्यामुळे अतिसार, गॅस्ट्रो, कावीळ, विषमज्वरसारख्या गंभीर आजारांचा प्रादुर्भाव होतो. या पार्श्वभूमीवर नागरिकांना स्वच्छ पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी आरोग्य विभागाकडून विविध उपाययोजना राबवल्या जातात. त्यासाठी जनजागृती केली जाते. आरोग्य विभागाने नोव्हेंबरमध्ये ३१७ ग्रामपंचायतींमधील ब्लिचिंग पावडरची गुणवत्ता तपासणी केली. त्यात ४७ ग्रामपंचायतींच्या ब्लिचिंग पावडरमध्ये क्लोरिनचे प्रमाण कमी आढळून आले. ब्लिचिंग पावडरमध्ये सुमारे २० टक्क्यांपेक्षा अधिक क्लोरिनचे प्रमाण असायला हवे, पण ग्रामपंचायतींच्या हलगर्जीपणामुळे ब्लिचिंग पावडर उघडी राहिल्यास त्यामधील क्लोरिनचे प्रमाण कमी होते.

आरोग्य विभागाने नोव्हेंबरमध्ये ब्लिचिंग पावडरची गुणवत्ता तपासणी केली. केकती, भोयरे पठार, वडगाव गुप्ता (नगर), मोगरस, शेरनखेल, कळंब, केळी कोतळ, खडकी, वांजुळशेत, परखतपूर (अकोले), पिंपरखेड, हसनाबाद (जामखेड), दुरगाव(कर्जत), मोर्वीस, चासनळी, मायेगाव देवी, दहिगाव बोलका, लौकी (कोपरगाव) निपाणी निमगाव, माळीचिंचाेरा, वंजारवाडी, सौदाळा, घोगरगाव, चिंचबन, महालक्ष्मी हिवरे, (नेवासे), सारोळा, हंगा, सांगवीसूर्या, गाडीलगाव (पारनेर), गीतेगाव, डांगेवाडी (पाथर्डी), कोल्हार बुद्रूक, सात्रळ, बारागाव नांदूर (राहुरी), सोनविहीर, आखेगाव (शेवगाव), हिवरगाव पठार, जांबूत बुद्रुक, धुपे, खांडगाव, कौठे खुर्द, कौठे बुद्रूक (संगमनेर), पारगाव सुद्रिक, खेतमाळीसवाडी, बनपिंप्री (श्रीगोंदे), वदळगाव, मालुंजा (श्रीरामपूर) या गावांमधील ब्लिचिंग पावडरमध्ये क्लोरिनचे प्रमाण २० टक्क्यांपेक्षा कमी आढळले. क्लोरिनचे प्रमाण अधिक असलेल्या पावडरचा वापर करण्याच्या सूचना त्यांना देण्यात आल्या आहेत. ज्या ग्रामपंचायती वारंवार सूचना देऊनही स्वच्छ पाणी पुरवठा करण्याबाबत गंभीर नाहीत, अशांवर कारवाईची तयारी जिल्हा परिषदेने सुरू केली आहे.

क्लोिरनचा वापर कशासाठी ?
क्लोिरनहे निर्जंतुकीकरणासाठी वापरले जाते. क्लोिरनमुळे पाण्यातील जीवाणू मारले जातात. क्लोिरनचे प्रमाण २० टक्क्यांपेक्षा जास्त मात्रा प्रमाणात असेल, तरच शंभर टक्के निर्जंतुकीकरण होऊ शकते. पावडरमधील क्लोिरनचे प्रमाण २० टक्क्यांपेक्षा कमी झाल्यास पाणी निर्जंतूक होत नाही. त्यामुळे असे पाणी पिणाऱ्यांना विविध प्रकारचे आजार होऊ शकतात, तसेच साथीचे आजार ग्रामीण भागात फैलावण्याची शक्यता असते, असे आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
महिनाभरात २६७ गावांचे पाणी नमुने दूषित
आरोग्यविभागाने नोव्हेंबर महिन्यात हजार १४४ पाणी नमुन्यांची जैविक तपासणी केली. त्यात २६७ गावांमधील पाणी नमुने दूिषत आढळून आले. त्यात सर्वाधिक अकोले तालुक्यातील ३३ पाणी नमुने दूषित आढळून आले आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील जनतेच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. याप्रकरणी मुख्य कार्यकारी अधिकारी शैलेश नवाल कोणती ठोस कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.