नगर- आगामी अडीच महिन्यांत जिल्ह्यातील पाणीटंचाईचा प्रश्न गंभीर होणार अाहे. जिल्हा प्रशासनाने टँकरने पाणी पुरवण्यासाठी तब्बल २६ कोटी ६१ लाख रुपये खर्च करण्याचे नियोजन आखले आहे. टंचाई निवारणासाठी २९ कोटी ६६ लाखांचा टंचाई कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. त्यातील कोटी वगळता उर्वरित रक्कम केवळ टँकरवर खर्च केली जाणार आहे.
कमी पावसामुळे खरीप हंगाम पूर्णपणे वाया गेला. रब्बी हंगामही शेतकऱ्यांच्या हाती काहीच लागले नाही. त्याचा सर्वाधिक फटका पाथर्डी, शेवगाव, जामखेड, कर्जत, श्रीगोंदे, नगर पारनेर या तालुक्यांना बसला. सन २०१५ मध्ये खरीप हंगामात लाख ८३ हजार ६०० हेक्टर क्षेत्रावर पेरणीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. त्यापैकी लाख हेक्टर क्षेत्रावर खरिपाच्या पेरण्या झाल्या. मात्र, पावसाने दडी मारल्यामुळे सर्व पिके जळून गेली. पिके जळून गेलेले बहुतांशी क्षेत्र दक्षिण नगर जिल्ह्यातील आहे. खरीप हंगामात ५८१ गावांची आणेवारी पन्नास पैशांपेक्षा कमी आहे. रब्बी हंगामातही तीच स्थिती होती. रब्बी हंगामात ७०० हून अधिक गावांची आणेवारी पन्नास पैशांपेक्षा कमी आहे.
तब्बल ८०० हून अधिक गावांची पाणी पातळी ते मीटरने खालवली आहे. त्यामुळे सातत्याने टँकरला मागणी वाढत आहे. दोन महिन्यांपूर्वी जिल्ह्यात अवघे २५० टँकर सुरू होते. आता ही संख्या ६०० वर गेली आहे. तब्बल दहा लाख नागरिक टँकरच्या पाण्यावर अवलंबून आहेत. गेल्या पंधरा दिवसांत टँकरची संख्या झपाट्याने वाढली आहे. उन्हाचा कडाका वाढल्याने पाण्याची पातळी खालावत चालली आहे. पाण्याचे उदभव, तलाव विहिरी आटू लागल्या आहेत. त्यामुळे टँकरच्या खेपांचीही संख्या घटत आहे.
आगामी अडीच महिन्यांत पाण्याचा प्रश्न आणखी गंभीर होणार आहे. टंचाईच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने एप्रिल, मे जून महिन्यासाठी २९ कोटी ६६ लाखांचा टंचाई कृती आराखडा तयार केला आहे. २६ कोटी ६२ लाख रुपयांची तरतूद ही केवळ टँकरसाठी करण्यात आली आहे. जूनपर्यंत टँकरची संख्या ७०० हून अधिक होण्याची शक्यता गृहित धरून प्रशासनाने ही तरतूद केली. कोटी १५ लाख ५० हजार रुपयांची तरतूद नवीन विंधन विहिरी घेण्यासाठी करण्यात आली आहे. २२ लाख ५० हजारांची तरतूद तात्पुरत्या उपाययोजना नळपाणी योजनेसाठी लाखांची तरतूद करण्यात आली आहे.
टँकरसाठीच मोठा खर्च
ऑक्टोबर२०१५ ते जून २०१६ या नऊ महिन्यांसाठी ७० कोटी ५९ लाख ३४ हजारांचा टंचाई कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. त्यात एप्रिल, मे जून महिन्यासाठी २९ कोटी ६६ लाखांचा टंचाई कृती आराखडा आहे. हा आराखडा केवळ पाणी पाण्यासंबंधी उपाययोजनांसाठी करण्यात आला असून, त्यात जनावरांच्या छावण्यांसाठी काहीच तरतूद करण्यात आलेली नाही.
छावण्यांची गरज...
जनावरांच्याचाराटंचाईचा प्रश्न गंभीर झाला अाहे. जिल्ह्यात १८ लाखांहून अधिक जनावरे आहेत. छावण्या सुरू करण्याचे आदेश महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी देऊन एक आठवडा उलटला, तरी जामखेड वगळता अन्य कुठेही छावण्या सुरू झालेल्या नाहीत. छावण्यांचे प्रस्ताव आल्यामुळे या छावण्या सुरू करण्यात आल्या नसल्याचे स्पष्टीकरण महसूल विभागाकडून दिले जात आहे.