आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Water Issue In Pathardi, Women's March In City President Office

पाथर्डी नगराध्यक्षांच्या खुर्चीला बांगड्या, चपलांचा हार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाथर्डी- पाथर्डी पालिका हद्दीतील हंडाळवाडी येथे तीन महिन्यांत पाणीपुरवठा केला जाईल, असे आश्वासन देऊनही ते पाळले नसल्याने गुरुवारी हंडाळवाडी येथील ग्रामस्थांनी पालिका कार्यालयावर हंडामोर्चा काढला. अचानक आलेल्या या मोर्चाला अधिकारी, पदाधिकारी सामोरे न गेल्याने संतप्त मोर्चेकर्‍यांनी नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष व मुख्याधिकार्‍यांच्या खुर्चीला बांगड्या व चपलांचा हार घालत निषेध व्यक्त केला. मागण्या मान्य होईपर्यंत या आठवड्यात उपोषण करण्याचा निर्णय घेत आंदोलन स्थगित करण्यात आले.

आंदोलनाचे नेतृत्व जगदीश काळे, माणिक काळे, सुभाष हंडाळ यांनी केले. तीन महिन्यांपूर्वी हंडाळवाडी शिवारातील जेधे, औटी, सोनवणे, भापकर, काळे, म्हस्के वस्ती तसेच विठ्ठलनगर परिसरात कायमस्वरूपी पाणीपुरवठा करावा, या मागणीसाठी येथील ग्रामस्थांनी पालिका कार्यालयावर मोर्चा काढला होता. तीन महिन्यांत प्रशासकीय मंजुरी घेऊन पाइपलाइनचे काम केले जाईल, असे आश्वासन त्यावेळी नगराध्यक्ष अभय आव्हाड व मुख्याधिकारी संतोष वारुळे यांनी दिले होते. मात्र, या आश्वासनाची पूर्तता न झाल्याने गुरुवारी हंडाळवाडी येथील ग्रामस्थांनी पालिकेवर मोर्चा काढला. मुख्याधिकारी वारुळे हे नगर येथे जिल्हाधिकार्‍यांच्या बैठकीला गेले असल्याने मोर्चेकर्‍यांना पालिकेचे कार्यकारी अधिकारी एम. बी. पालवे सामोरे गेले. हंडाळवाडीचा पाइपलाइनचा प्रस्ताव शासन दरबारी सादर केला असून मंजूर होताच काम सुरू केले जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले. मात्र, सक्षम अधिकारी किंवा पदाधिकारी आल्याशिवाय मोर्चा विसजिर्त केला जाणार नाही, अशी भूमिका आंदोलनकर्त्यांनी घेत पालिका कार्यालयात ठिय्या मांडला. चार तास उलटूनही अधिकारी न आल्याने संतप्त मोर्चेकर्‍यांनी नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष व मुख्याधिकार्‍यांच्या खुच्र्यांना चपला व बांगड्यांचा हार घातला. मागणी मान्य होईपर्यंत उपोषण करण्याचा निर्णय घेत आंदोलन मागे घेण्यात आले. मोर्चात मधुकर काळे, भारत भापकर, उमेश औटी, शालन जेधे, शोभा जेधे आदी सहभागी झाले होते.

पाठपुरावा करणार
हंडाळवाडीच्या पाणीप्रश्नची जाण आहे. यासाठी स्वत: पाठपुरावा करत असून लवकरच हा प्रo्न सोडवला जाईल. आंदोलनाची पूर्वकल्पना असती, तर आंदोलकांचे म्हणणे समजून घेता आले असते.
- दीपाली बंग, उपनराध्यक्ष, पाथर्डी.

प्रस्ताव पाठवला
हंडाळवाडीचा प्रस्ताव मंत्रालयात पाठवला असून तो मंजूर होताच पाणी योजनेचे काम केले जाईल. या प्रभागाचे पूर्वी नेतृत्व केले असून येथील प्रo्नांची जाण आहे. पूर्वकल्पना दिली असती, तर आंदोलकांच्या भावना समजून घेतल्या असत्या.
- अभय आव्हाड, नगराध्यक्ष.