आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Water Issue: Nagar Residents Disappointed Over Releasing Water In Jayakwadi

पाणीप्रश्न पेटला; जायकवाडी धरणात पाणी सोडल्याने नगरकर संतप्त

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
छायाचित्र: मुळा धरणातून जायकवाडीसाठी पाणी सोडल्याच्या निषेधार्थ सोमवारी नेवासे तालुक्यातील भेंडा येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.छाया : श्रीनिवास रक्ताटे
नगर - मुळा धरणातून जायकवाडीस पाणी सोडण्याच्या निर्णय मागे घेण्याच्या मागणीसाठी सोमवारी भेंडे येथे नेवासे-शेवगाव राज्य मार्गावर नगर जिल्ह्यातील सर्वपक्षीय नेते कार्यकर्त्यांनी रास्ता रोको आंदोलन केले. हे आंदोलन एक तास सुरू असल्याने राज्यमार्गाच्या दुतर्फा वाहनांच्या रांगा लागून वाहतूक खोळंबली होती.

मुळा धरणातून जायकवाडीस पाणी सोडण्याच्या निर्णय मागे घेण्याच्या मागणीसाठी सोमवारी भेंडे येथे नेवासे-शेवगाव राज्य मार्गावर सर्वपक्षीय नेते कार्यकर्त्यांनी रास्ता रोको आंदोलन केले. या वेळी सर्वच नेत्यांनी जायकवाडीस पाणी सोडण्याच्या निर्णयाविरोधात संतप्त भावना व्यक्त केल्या. मंगळवारी (९ डिसेंबर) मुळा धरणाचे गेटबंद आंदोलन करण्याचा इशारा दिला. हे आंदोलन एक तास सुरू असल्याने राज्यमार्गाच्या दुतर्फा वाहनांच्या रांगा लागून वाहतूक खोळंबली होती.

मुळा धरणातून जायकवाडीस पाणी सोडण्याच्या विरोधात सोमवारी माजी आमदार चंद्रशेखर घुले, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष पांडुरंग अभंग यांच्या नेतृत्वाखाली भेंडे येथे सर्वपक्षीय रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या वेळी अ‍ॅड. देसाई देशमुख, काशीनाथ नवले, कॉम्रेड बाबा आरगडे यांनी शासनाच्या पाणी सोडण्याच्या निर्णयाविरोधात संतप्त भावना व्यक्त करत जायकवाडीत ४७ टीएमसी पाणी साठा असतानाही पाणी सोडण्याचा हा घात अन्यायकारक असून 'मुळा'चे पाणी म्हणजे शेतक-यांचे रक्त आहे, तेच काढून घेणार असेल, तर शेतकरी कसा
जगणार, असा सवाल करून "मुळा'चे गेट उघडून देणार नसल्याचे स्पष्ट केले. कुकाणे मंडल आधिका-यांना मागणीचे निवेदन देऊन रास्ता रोको स्थगित करण्यात आला.

गेट बंद करण्याचा इशारा
नगर जिल्ह्यातील सर्व आमदार मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन पाणी सोडण्याचा निर्णय मागे घेण्याची मागणी करू. हा निर्णय रद्द केला नाही, तर मंगळवारी मुळा धरणावर जाऊन गेटबंद आंदोलन करू, असा इशारा राष्ट्रवादी कॉंग्रेसचचे जिल्हाध्यक्ष पांडुरंग अभंग यांनी सोमवारी दिला.

काँग्रेसचा चक्काजाम
भंडारदरा व निळवंडे धरणातून जायकवाडीसाठी पाणी सोडण्याच्या निर्णयाविरोधात आमदार भाऊसाहेब कांबळे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष जयंत ससाणे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस कार्यकर्त्यांनी सोमवारी शहरासह तालुक्यात ठिकठिकाणी चक्काजाम आंदोलन केले.

राहुरीचे शिवसैनिकही रस्त्यावर
नगर जिल्ह्यातील धरणातील पाणी मराठवाड्यासाठी सोडण्याच्या निषेधाथे राहुरी येथील शिवसैनिकांनी सोमवारी नगर-मनमाड राज्यमार्गावर रास्ता रोको आंदोलन करून संताप व्यक्त केला.

दरवाजे उघडण्यास विरोध
नदीपात्रातील बंधा-यांचे दरवाजे काढण्यासही विरोध करण्याचा प्रयत्न झाला. हा विरोध मोडून काढण्यासाठी पोलिसांची मदत घेण्यात आली. पोलिसांचा फौजफाटा तैनात असल्याने दरवाजे हटवण्यात पाटबंधारे विभागाला विरोध झाला नाही.