आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाण्यासाठी नगराध्यक्षांसह नगरसेवकांचे 2 तास धरणे

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाथर्डी - पाथर्डी शहराचा पाणीपुरवठा सुरळीत करण्याच्या मागणीसाठी बुधवारी नगराध्यक्ष अभय आव्हाड यांनी आक्रमक भूमिका घेत नगरपालिकेतील सत्ताधारी आघाडीच्या नगरसेवकांसह तहसील कार्यालयाच्या दारात सुमारे दोन तास धरणे आंदोलन करत कामकाज बंद पाडले.

पाथर्डी व शेवगाव शहरासह 48 गावांना जायकवाडी प्रादेशिक योजनेद्वारा पाणीपुरवठा केला जातो. यावर्षी उन्हाळ्यात शहराचा पाणीपुरवठा पूर्णपणे विस्कळीत झाला. नियमितपणे शहराला दिवसाआड सहा लाख लिटर पाणी मिळत असताना सध्या दीड लाख लिटरच पाणी मिळत आहे. त्यातच योजनेच्या पाइपला काळेगावलगत तीन दिवसांपासून गळती लागल्याने टंचाईची तीव्रता वाढली. अमरापूर येथून नियमितपणे 22 टँकर भरले जात असल्याने पाथर्डीकरांना पाणी मिळणे दुरापास्त झाले.

या पार्श्वभूमीवर नगराध्यक्ष आव्हाड यांनी बुधवारी तहसील कार्यालयाच्या प्रवेशद्वारात आंदोलन केले. त्यामुळे प्रशासनाची मोठी धावपळ उडाली. या आंदोलनात नगरसेवक नंदकुमार शेळके, प्रमोद भांडकर, बंडू बोरुडे, राजेंद्र उदमले, नगरसेविका मंगल कोकाटे, स्वाती सोनटक्के, खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष मधुकर काटे, माजी नगराध्यक्ष हिंदकुमार औटी, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष मिठूभाई शेख, रमेश गोरे, पांडुरंग सोनटक्के, भारती असलकर व हंड्यासह महिला सहभागी झाल्या होत्या. महिला आक्रमक झाल्या होत्या. नायब तहसीलदार जगदीश गाडे, गटविकास अधिकारी यशवंत सदावर्ते, महावितरणचे टी. एस. वाणी, पाणीपुरवठाचे सुरेश भणगे यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.