आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेवगाव-पाथर्डी सुरू; मिरी-तिसगाव बंदच

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - जिल्हापरिषदे मार्फत चालवल्या जाणाऱ्या पाच प्रादेशिक पाणी योजनांपैकी शेवगाव-पाथर्डी मिरी-तिसगाव या प्रादेशिक पाणी योजना बंद पडलेल्या होत्या. परंतु, शेवगाव-पाथर्डी पाणी योजनेचा पंंप दुरुस्त झाल्याने ही योजना सुरळीत सुरू झाली. पण, मिरी-तिसगाव योजनेची दुरुस्ती झाल्याने ही योजना बंदच असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडून समजली. त्यामुळे ऐन पावसाळ्यात जनतेला पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे.

जिल्ह्यातील ४३ प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांपैकी प्रादेशिक योजना स्थानिक समित्यांनी हस्तांतरित केल्याने त्या जिल्हा परिषदेमार्फत चालवल्या जात आहेत. योजना चालवण्याची मुदत संपल्यानंतर पदाधिकारी सदस्यांच्या दबावामुळे या योजनांना मुदतवाढ मिळाली. या योजना चालवण्यासाठी गटविकास स्तरावर खाते उघडून त्या चालवण्याचे आदेश यापूर्वीच मुख्यकार्यकारी अधिकारी शैलेश नवाल यांनी दिले आहेत. परंतु, पुरेशी वसुली नसल्याने, तसेच दुरुस्ती देखभालीला निधी अपुरा पडत असल्याने या योजना अडचणीत सापडल्या आहेत. तसेच ठेकेदारांनाही योजना चालवण्याबद्दल दिली जाणारी बिलेही वेळेत भरली जात नाहीत. त्यामुळे योजना आर्थिक संकटात सापडल्या आहेत. या योजनांच्या पुनर्जिवनासाठी काही दिवसांपूर्वी जिल्हा परिषदेने जिल्हा नियोजन समितीकडे प्रस्ताव पाठवला आहे. परंतु, त्याला अद्याप मंजुरी मिळाली नसल्याची माहिती काही अधिकाऱ्यांनी दिली.

मिरी-तिसगाव योजनेचे पाइपलाइन फुटल्याने दोन्ही योजना बंद पडल्या आहेत. त्यामुळे या योजनेला तातडीने दुरुस्तीची गरज असल्याचे मागील स्थायी समितीच्या सभेत दुरुस्ती करण्याचे आदेश देण्यात आले. परंतु, निधीची चणचण असल्याने योजनांच्या दुरुस्तीला मुहूर्त मिळत नव्हता. पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी अजून, तरी गांभीर्याने घेतले नाही. शेवगाव-पाथर्डी योजना जुनी झाल्याने तेथील यंत्रणा वारंवार नादुरुस्त होत असते. या योजनेच्या दोन उपसा पंपापैकी एक पंप पूर्वीच बंद पडला असून दुसरा पंपही बंद पडल्याने योजना बंद पडली. पण अमरापूर येथील नादुरुस्त झालेला पंप पहाटे दुरुस्त होऊन उपसा सुरू झाल्याची माहिती पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली. मिरी-तिसगाव योजनेची पाइपलाइन फुटल्याने ही योजना मंगळवारपासून (२२ सप्टेंबर) बंद आहे. त्यामुळे अधिकारी स्तरावरून योजना सुरळीत सुरू करण्यासाठी धावपळ सुरू आहे. दोन्ही योजनांचा एकच पंप सुरू असून, हे पंपही बंद पडले, तर ८० गावांच्या पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण होईल. जनतेला अंतर्गत राजकारण, प्रशासकीय सोपस्कर पूर्ण होणे याचे काहीच देणे-घेणे नाही. जनतेला केवळ पाणी हवे आहे, त्यामुळे प्रशासनावर दबाव वाढत असून लवकरात लवकर योजना सुरू केल्या नाही, तर जनता रस्त्यावर उतरण्याच्या तयारी आहे.
दुरुस्तीला पैसे कोण देणार ?
शेवगाव-पाथर्डीमिरी-तिसगाव योजनांची गळती कमी केली. पण पंप दुरुस्तीसह इतर साहित्य उपलब्ध होत नसल्यानेही अडचणी वाढल्या आहेत. त्यातच दुरुस्तीला पैसे कोण देणार असाही प्रश्न निर्माण झाला आहे. पालकमंत्री राम शिंदे यांनी लक्ष घालून जिल्हा नियोजनमधून मंजुरी द्यावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

पंप दुरुस्तीसाठी
^शेवगाव-पाथर्डीपाणी योजना सुरू करण्यासाठी अमरापूरचा बंद पडलेला पंप दुरुस्त करून योजना सुरू करण्यात आली. परंतु, मिरी-तिसगाव योजनेची अजूनही दुरुस्ती झालेली नाही. त्या योजनेचा पंप दुरुस्तीसाठी पाठवला आहे.'' सुरेंद्र कुमार कदम, कार्यकारी अभियंता.