आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पाणी मीटर निवडीचा अधिकार ग्रामसभेचा - शैलेश नवल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - गावागावांमध्ये१४ व्या वित्त आयोगातून पाणी मीटर बसवण्याचे काम सुरु आहे. मीटरबाबत इस्टिमेट तयार करून तांत्रिक मंजुरी देण्याचे काम फक्त पंचायत समितीचे आहे. मीटर कोठून घ्यायचे, कोणते घ्यायचे हा अधिकार सर्वस्वी ग्रामसभेचा आहे. त्यावर कोणीही बंधने लादू शकत नाही, असे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) शैलेश नवाल यांनी सांगितले.

नगर तालुक्यातील पाणी मीटर गैरव्यवहाराबाबत ते बोलत होते. ते म्हणाले, आपल्याकडे ग्रामसभा सर्वश्रेष्ठ आहे. १४ व्या वित्त आयोगाचा निधी ग्रामसभेला मिळाल्यानंतर ग्रामपंचायतींनी २६ जानेवारीच्या ग्रामसभेत गावात काय-काय कामे करावयाची आहेत. याचा आराखडा तयार केला. तो आराखडा पंचायत समितीकडे आला. ग्रामसभेच्या आराखड्याला तांत्रिक मंजुरी कामाचे इस्टिमेट तयार करण्याचे काम पंचायत समितीचे आहे. पाणी मीटर कोणते घ्यायचे याचा अधिकार ग्रामसभेचा आहे. ग्रामपंचायतींनी आयएसआय किंवा ईईसी नामांकन प्राप्त कंपन्यांचे पाण्याचे मीटर बाजारात पहावी. त्यातील काही मीटर ग्रामसभेसमोर ठेवावीत. ग्रामसभेत मीटरच्या दर्जाबाबत किमतीबाबत चर्चा व्हावी आणि त्यानंतर ग्रामसभेनेच कोणते मीटर घ्यायचे याबाबत निर्णय घ्यावा हे अपेक्षित आहे. पाणी मीटरबाबत कोणताही अधिकारी किंवा पदाधिकारी सक्ती करू शकत नाही. याबाबत कोणत्याही गावच्या ग्रामस्थांनी किंवा ग्रामपंचायतीने तक्रार केल्यास जिल्हा परिषद कारवाई करेल, असेही शैलेश नवाल म्हणाले.

५० गावांमधून पाणी मीटरची मागणी
बाबुर्डीघुमट, शेंडी, सारोळा कासार, खातगाव टाकळी, टाकळी खातगाव, घोसपुरी, वाटेफळ, नेप्ती, नागरदेवळे, नारायण डोहो, देहरे, खोसपुरी, पिंपळगाव उज्जैनी, इमामपूर, पांगरमल, बाराबाभळी, उदरमल, वडारवाडी, दरेवाडी, जेऊर, खंडाळा, शिराढोण, मांजरसुंभा, आगडगाव, वाळकी, रूईछत्तीसी, सारोळा बद्दी, हिंगणगाव, अकोळनेर, कर्जुने खारे, शहापूर, केकती, आठवड, बाबुर्डी बेंद, देऊळगाव सिद्धी, तांंदळी, वडगाव, रतडगाव, पिंप्री घुमट, निंबाेडी, चास, डोंगरगण, खडकी, सोनेवाडी-चास, हिवरे झरे, टाकळी काझी, दशमी गव्हाण, साकत, निमगाव घाणा, चिचोंडी पाटील. या गावांनी पाणी मीटरची मागणी केली आहे.

निंबळकला २००१ मध्ये बसवले होते मीटर
मी सरपंच असताना, निंबळक ग्रामपंचायतीने जिल्ह्यात प्रथम पाण्यासाठी २००१ मध्ये मीटर पद्धतीचा वापर सुरू केला. त्यावेळी प्रत्येक मीटर मागे १२५० ते १३०० रुपये खर्च आला होता. आजही काही नवीन नळजोड होत आहेत. यासाठी १७०० ते १८०० रुपये खर्च येतो. आमच्या स्ट्रक्चरची दखल नगर जिल्हा परिषद पाणी पुरवठा इतर जिल्ह्यातील जिल्हा परिषदा, नगर पंचायतींनी घेतली आहे. १५ वर्षंापूर्वी बसवलेले मीटर आजही सुरू आहेत. विलासराव लामखडे, माजी सरपंच, निंबळक, ता. नगर.
बातम्या आणखी आहेत...