आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Water Not Release In Jayakwadi Nashik, Nagar Leaders

जायकवाडीला थेंबभर पाणीही सोडणार नाह; नाशिक, नगरमधील सर्वपक्षीयांची एकजूट

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शिर्डी - रबीसाठी दोन आवर्तने देण्याचा निर्णय घेतला, पण उन्हाळी आवर्तनाचे ठरवले नाही, म्हणून संतापलेल्या नाशिक, नगर जिल्ह्यातील सर्वपक्षीय नेते व शेतक-यांनी पाण्याच्या खेळखंडोब्याला कार्यकारी अभियंता सुनील बाफना जबाबदार असल्याचा कांगावा केला आहे. एवढेच नाही तर गोदावरी धरण समूहातून जायकवाडी धरणास थेंबभरही पाणी सोडले जाणार नाही आणि विधानसभेत झालेला सिंचनाचा कायदा रद्द करावा, असे ठरावही कालवा सल्लागार समितीने शनिवारी घेतले.

समितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे यांच्या उपस्थितीत समितीच्या बैठकीस माजी मंत्री शंकरराव कोल्हे, शिर्डीचे खासदार सदाशिव लोखंडे, राजेंद्र वझे, भाऊसाहेब कांबळे, स्नेहलता कोल्हे हे आमदार व शेतकरी हजर होते. दरम्यान, जायकवाडीला थेंबभरही पाणी जाऊ देणार नाही. शिवसेनेचा असलो तरी या प्रश्नी सर्व नेत्यांसोबत आंदोलन करणार, असे खासदार लोखंडे म्हणाले.

मंजूर ठराव असे
- विधानसभेत मंजूर २००५ चा सिंचनाचा कायदा रद्द करा
- नाशिकच्या कुंभमेळ्यासाठी पाणी आरक्षण रद्द करा
- सिन्नरच्या इंडिया बुल्सचे पाणी आरक्षण रद्द करा

माझा आधीच विरोध
* जायकवाडीच्या पाण्याला माझा आधीपासून विरोध होता. आता काहींना काहींना (थोरात, पीचड) उशीरा का होईना शहानपण सुचले. आपले सरकार होते, तेव्हा कारस्थाने केली.
राधाकृष्ण विखे, आमदार, काँग्रेस.

जेलभरो करणार
* नगर, नाशिकचे पाणी जाण्यास पवार काका-पुतणे जबाबदार आहेत. राष्ट्रवादी सोडून मी संघर्षाची भूमिका घेतली आहे. भंडारदरा, दारणाचे पाणी सोडू देणार नाही. क्षमता ३५ टक्के असताना जायकवाडी ६५ टक्के झालेच कसे? कुंभमेळ्याच्या निधीतून टिटवी धरण पूर्ण करा.
शंकरराव कोल्हे, माजी महसूलमंत्री