आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नळजोडाच्या नावाखाली केडगावकरांची लूट

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(नळजोडासाठी वापरण्यात आलेले पाइप हलक्या दर्जाचे असल्याच्या केडगावातील बहुसंख्य नागरिकांच्या तक्रारी आहेत. नगरसेवक मात्र गप्प आहेत. छाया: अमित शिंदे)
नगर- केडगावपाणी योजनेंतर्गत (फेज १) नवीन जलवाहिन्यांवर नळजोड घेण्यासाठी नागरिकांकडून सक्तीने पैसे (खर्च) वसूल करण्यात येत आहेत. नळजोडासाठी वापरण्यात येणाऱ्या साहित्याचा दर्जा, तसेच पैसे भरल्यानंतर घरापर्यंत नळजोड मिळेल की नाही, याबाबत नागरिकांमध्ये संभ्रम आहे. त्यामुळे नागरिक नळजोडाचा खर्च देण्यास तयार नाहीत. आतापर्यंत केवळ ५२ नळजोडांचे काम पूर्ण झाले असून हजार १४ नागरिकांनी नळजोडासाठी अर्ज केला आहे. मनपाकडून सुरू असलेल्या या अार्थिक लुटीबाबत नागरिक संताप व्यक्त करत आहेत.
केंद्र शासनाच्या युअायडीएसएसएमटी योजनेंतर्गत केडगाव उपनगरात सुरू असलेल्या पाणी योजनेचे (फेज १) काम अनेक वर्षे रखडले होते. त्यामुळे त्याचा खर्च मोठ्या प्रमाणात वाढला. काम रखडल्याबद्दल ठेकेदाराकडून दंड वसूल करण्याऐवजी नागरिकांच्या माथी नळजोडाचा भुर्दंड लादण्यात आला आहे. नवीन जलवाहिन्यांवर नळजोड स्थलांतरीत करण्याचे काम गेल्या महिन्यापासून हाती घेण्यात आले आहे. त्यासाठी येणारा तब्बल कोटी ४७ लाखांचा खर्च केडगावकरांकडून वसूल करण्यात येत आहे.
नळजोडाचा खर्च कोणी करायचा, असा प्रश्न निर्माण झाल्याने प्रारंभी हे काम रखडले होते. अखेर महापालिकेची अार्थिक स्थिती पाहता हा खर्च नागरिकांनीच करावा, असा ठराव (नागरिकांना विश्वासात घेता) सर्वसाधारण सभेत करण्यात आला. स्थानिक नगरसेवकांनीही केडगावच्या रहिवाशांचे हित पाहिले नाही. नागरिकांनी नळजोडाचा पन्नास टक्के खर्च रोख, तर उर्वरित पन्नास टक्के खर्च संकलित करातून करावा, असा निर्णय सभेत घेण्यात आला.

या कामासाठी एस. आर. कन्स्ट्रक्शन या ठेकेदार संस्थेची निविदा मंजूर करण्यात आली. या संस्थेने नळजोडाचे काम सुरू केले आहे. मात्र, दोन ते तीन हजार रूपये खर्च करून नळजोड मिळेल की नाही, त्यासाठी वापरण्यात येणारे साहित्य दर्जेदार असेल की नाही, घरापर्यंत नळजोड मिळेल की, पुन्हा वेगळा खर्च करावा लागेल, असे अनेक प्रश्न नागरिकांना पडले आहेत. मनपाने या प्रश्नांची उत्तरे देताच नागरिकांकडून सक्तीने नळजोडाचा खर्च वसूल करण्यास सुरूवात केली आहे.
जोपर्यंत नागरिक नळजोडाचा ५० टक्के खर्च रोख भरत नाहीत, तोपर्यंत नळजोडाच्या कामास गती मिळणार नाही, अशी भूमिका मनपाने घेतली आहे. मनपाने केडगावात दहा हजार माहितीपत्रके वाटून नळजोडाचा खर्च भरण्याचे आवाहन नागरिकांना केले. परंतु नागरिक पैसे भरण्याबाबत संभ्रमात आहेत. केडगावात हजार २०० नळजोडांची नोंदणी आहे. त्यात आणखी सुमारे हजार नळजोडांची भर पडेल, असा मनपाचा अंदाज आहे. आतापर्यंत अवघ्या ५२ नळजोडांचे काम पूर्ण झाले आहे. हजार १४ नागरिकांनी नळजोडासाठी अर्ज केला आहे. उर्वरित नागरिक पैसे भरण्यास तयार नाहीत.

या कामासाठी एस. आर. कन्स्ट्रक्शन या ठेकेदार संस्थेची निविदा मंजूर करण्यात आली. या संस्थेने नळजोडाचे काम सुरू केले आहे. मात्र, दोन ते तीन हजार रूपये खर्च करून नळजोड मिळेल की नाही, त्यासाठी वापरण्यात येणारे साहित्य दर्जेदार असेल की नाही, घरापर्यंत नळजोड मिळेल की, पुन्हा वेगळा खर्च करावा लागेल, असे अनेक प्रश्न नागरिकांना पडले आहेत.
मनपाने या प्रश्नांची उत्तरे देताच नागरिकांकडून सक्तीने नळजोडाचा खर्च वसूल करण्यास सुरूवात केली आहे. जोपर्यंत नागरिक नळजोडाचा ५० टक्के खर्च रोख भरत नाहीत, तोपर्यंत नळजोडाच्या कामास गती मिळणार नाही, अशी भूमिका मनपाने घेतली आहे. मनपाने केडगावात दहा हजार माहितीपत्रके वाटून नळजोडाचा खर्च भरण्याचे आवाहन नागरिकांना केले. परंतु नागरिक पैसे भरण्याबाबत संभ्रमात आहेत. केडगावात हजार २०० नळजोडांची नोंदणी आहे. त्यात आणखी सुमारे हजार नळजोडांची भर पडेल, असा मनपाचा अंदाज आहे.
आतापर्यंत अवघ्या ५२ नळजोडांचे काम पूर्ण झाले आहे. हजार १४ नागरिकांनी नळजोडासाठी अर्ज केला आहे. उर्वरित नागरिक पैसे भरण्यास तयार नाहीत.नळजोडासाठी खोदकाम केल्याने रस्त्यांची अशी वाईट अवस्था झाली आहे. नळजोड घराच्या भिंतीपर्यंतच देण्यात येत आहेत. त्यामुळे नागरिकांना भिंतीच्या आत नळजोड घेण्यासाठी खर्च करावा लागेल.

परस्पर निर्णय
नळजोडाचाखर्च नागरिकांनीच करण्याचा निर्णय महासभेत घेण्यात आला. हा निर्णय घेण्यापूर्वी नागरिकांना विचारण्यात आले नाही. नगरसेवकांनी परस्पर हा निर्णय घेतला. त्यामुळे अधिक पैसे मोजावे लागणार असल्याची ओरड होत आहे. पाण्यासाठी वर्षानुवर्षे त्रास सहन करणाऱ्या केडगावकरांना नळजोडाचा मोठा अार्थिक भुर्दंड सहन करावा लागत असल्याने त्याविषयी संतप्त प्रतिक्रिया केडगावकर व्यक्त करत आहेत.

पाणीपुरवठा बंद करण्याच्या धमक्या
मनपानेकेडगावकरांना विश्वासात घेता नळजोडाचा कोट्यवधी रुपयांच्या खर्च त्यांच्या माथी मारला. हा खर्च सक्तीने वसूल करण्याची मोहीम मनपाने काही दिवसांपासून सुरू केली आहे. पैसे भरा; अन्यथा पाणीपुरवठा बंद करू, अशा धमक्या मनपाचे कर्मचारी घरोघरी जाऊन देत आहेत. नागरिक पैसे भरण्यास तयार आहेत, परंतु पैसे भरल्यानंतर नळजोड िकती दिवसांत मिळेल, त्यासाठी कोणते पाइप वापरणार, नळजोडाचे अंतर कमी असल्यास कमी पैसे भरता येतील का, ठेकेदार चांगले काम करेल का, अशा अनेक शंका नागरिकांच्या मनात आहेत.
पाइप हलक्या दर्जाचे
स्वखर्चानेनळजोड घेतला असता, तर त्यासाठी हजार-बाराशे रुपये खर्च आला असता. मनपा मात्र दुपटीने वसूल करत आहे. ठेकेदार जे पाइप वापरत आहे, ते हलक्या दर्जाचे आहेत. त्यावर आयएसओ मानांकन नाही. नंतर पाइप फुटला, तर दुरूस्तीचा खर्च कोण करणार? तसेच हा नळजोड केवळ संरक्षक भिंतीपर्यंतच देण्यात येत आहे. आत नळजोड घेण्यासाठी पुन्हा खर्च करावा लागणार आहे. असे अनेक आक्षेप नागरिक घेत आहेत.
प्रत्येक नळजोडासाठी लागणारा खर्च
रस्ताओलांडून नळजोड : ३०५२ रुपये
रस्ता ओलांडता नळजोड : २२९१ रुपये
नळजोडापूर्वी रोख स्वरूपात : ५० टक्के
संकलित कराच्या िबलातून : ५० टक्के
आतापर्यंतचे दिलेले नळजोड : ५२
आतापर्यंत आलेले अर्ज : ३०१४