आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नगर जिल्ह्यातील 14 गावांना दूषित पाणी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत करण्यात आलेल्या पाणी योजना स्वच्छता सर्वेक्षणानुसार शुद्ध व सुरक्षित पाणीपुरवठा करण्यात हलगर्जीपणा करणार्‍या जिल्ह्यातील 14 ग्रामपंचायतींना लाल कार्ड तर अस्वच्छता असलेल्या 53 ग्रामपंचायतील पिवळे कार्ड देण्यात आले आहे.

जागतिक आरोग्य संघटना व केंद्र सरकारने पाणी गुणवत्ता सनियंत्रण सर्वेक्षण कार्यक्रमांतर्गत स्रोतनिहाय स्वच्छता सर्वेक्षण करण्याचे निर्देश दिले होते. यात स्वच्छतेनुसार चार प्रकारात ग्रामपंचायतीचे वर्गीकरण केले जाते. त्यात अनियमित पाणी शुद्धीकरण करणे, स्रोताचा परिसर अस्वच्छ ठेवणे, पाणी गळती, टीसीएल पावडरचा अपुरा वापर आदी बाबी आढळून आल्यास त्या ग्रामपंचायतीला लाल कार्ड दिले जाते. तसेच गावात अस्वच्छता असलेल्या ग्रामपंचायतींना पिवळे कार्ड दिले जाते. तसेच उत्कृष्ट नियोजन व स्वच्छता ठेवणार्‍या ग्रामपंचायतींना हिरवे व चंदेरी कार्ड दिले जाते.