आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आठ दिवसांत काम सुरू करा; अन्यथा आंदोलन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - बंद पडलेल्या शहर सुधारित पाणी योजनेबाबत (फेज टू) अखेर विरोधक आक्रमक झाले. फेज टूचे काम बंद झाले हे सत्ताधाऱ्यांचे दुर्भाग्य आहे. येत्या आठ दिवसांत काम सुरू झाले नाही, तर तीव्र आंदोलन उभे करू, असा इशारा विरोधकांनी गुरूवारी आयुक्त विजय कुलकर्णी यांना दिला. आतापर्यंत झालेल्या कामाची येत्या साेमवारी अधकिाऱ्यांसह पाहणी करणार असल्याचेही यावेळी विरोधकांनी सांगितले.
ठेकेदार संस्था तापी प्रिस्टेजने फेज टूचे काम ३१ मार्चपासून बंद केले आहे. महापालिकेकडून सहकार्य मिळत नसल्याचे कारण या संस्थेने पुढे केले आहे. मनपाने करारनाम्याचा भंग करत काही कामांसाठी नव्याने २० कोटी रुपयांची निविदा मंजूर केली. त्यामुळेच ठेकेदार संस्थेने काम बंद केले आहे. या निविदाप्रकरणात मोठ्या प्रमाणात अार्थकि देवाण-घेवाण झाल्याची चर्चा आहे.

फेज टू हा नगरकरांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. गेल्या साडेचार वर्षांपासून योजनेचे काम रखडले आहे. योजनेच्या कामाचा खर्च ११६ कोटींवरून १२३ कोटींवर गेला आहे. आतापर्यंत ठेकेदाराला ५६ कोटी देण्यात आले, काम मात्र अवघे ४० ते ५० टक्केच पूर्ण झाले आहे. या योजनेत संपूर्ण शहरात ५६५ किलोमीटर लांबीच्या अंतर्गत जलवाहिन्या टाकण्यात येणार आहेत. आतापर्यंत केवळ शंभर किलोमीटर अंतराची जलवाहिनी टाकण्यात आली. उर्वरित ४५६ किलोमीटर जलवाहिनी टाकण्याचे काम कधी पूर्ण होणार, याबाबत शंकाच आहे. युतीच्या काळात सुरू झालेल्या योजनेच्या कामास सुरूवातीला गती मिळाली. त्यानंतर मात्र हे काम रखडले. आता तर ते पूर्णपणे बंदच झाले आहे. त्यामुळे आक्रमक झालेल्या सेना-भाजपचे पदाधिकारी नगरसेवकांनी आयुक्त कुलकर्णी यांना गुरूवारी जाब विचारला. शहराच्या भविष्याचा विचार करून सुरू केलेली ही योजना सध्या शेवटची घटका मोजत आहे, हे सत्ताधारी शहराचे दुर्भाग्य आहे. योजनेचे बंद झालेले काम तत्काळ सुरू करण्यासाठी ठोस पावले उचला, अन्यथा येत्या आठ दिवसांत शहरात तीव्र आंदोलन उभे करण्यात येईल, असा इशारा विरोधकांनी दिला.

या योजनेंतर्गत कोणती कामे झाली ती दाखवा, अशी मागणीही विरोधकांनी आयुक्तांकडे केली. आयुक्तांनी ही मागणी मान्य करत येत्या सोमवारी झालेली कामे दाखवण्याचे कबूल केले. संबंधित ठेकेदार संस्थेच्या प्रतिनिधींशी बोलून काम सुरू करण्याबाबत तोडगा काढण्याचे आश्वासनही आयुक्त कुलकर्णी यांनी दिले.

पुढे काय होणार?
येत्या तीन-चार दिवसांत ठेकेदार संस्थेच्या प्रतिनिधींशी काम सुरू करण्याबाबत चर्चा करण्यात येणार आहे. आमदार तथा महापौर संग्राम जगताप आयुक्त विजय कुलकर्णी यांच्या प्रमुख उपस्थितीत ही चर्चा होईल. पंतु त्यासाठी ठेकेदार संस्थेची भूमकिा महत्त्वाची ठरणार आहे. सद्यस्थिती पाहता ठेकेदार संस्था काम करण्यास तयार होण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे मनपाला फेज टूच्या उर्वरित कामासाठी पुन्हा नवीन ठेकेदाराची नेमणूक करावी लागणार आहे. परंतु अर्धवट काम करण्यास नवीन ठेकेदार मिळाल्यास योजनेचे काम आणखी काही वर्षे रखडणार आहे.


मनसे भेटणार मुख्यमंत्र्यांना
मनसेनगरसेवक पदाधकिाऱ्यांनी वेगवेगळ्या भूमकिा घेतल्या आहेत. फेज टूच्या काही कामासाठी जी २० कोटींची निविदा मंजूर करण्यात आली, ती बेकायदेशीर आहे, असा दावा मनसेचे जिल्हाध्यक्ष सचिन डफळ यांनी केला आहे. मात्र, निविदेस मंजुरी देणारे स्थायी समितीचे माजी सभापती किशोर डागवाले हे मनसेचेच आहेत. असे असले तरी मनसेचे काही पदाधिकारी फेज टू प्रकरणी येत्या तीन-चार दिवसांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटणार असल्याची माहिती नितीन भुतारे यांनी दिली.
आयुक्त धारेवर
"दिव्यमराठी'ने वृत्त प्रसिध्द करताच शिवसेना, भाजप मनसेचे पदाधिकारी नगरसेवकांनी प्रशासनाला जाब विचारला. सेनेचे नगरसेवक अनिल शिंदे, माजी महापौर भगवान फुलसौंदर, शहरप्रमुख संभाजी कदम, विक्रम राठोड, दगिंबर ढवण, दीपाली बारस्कर, सागर बोरुडे, सचिन जाधव, उमेश कवडे, तसेच भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष अभय आगरकर, बाबासाहेब वाकळे, मनीषा बारस्कर, उषा नलावडे, मालन ढोणे आदींनी आयुक्तांना चांगलेच धारेवर धरले. सेना-भाजपचे नगरसेवक मोर्चा आणत असल्याची माहिती कळताच मनपा कार्यालयात बंदोबस्त वाढण्यात आला.
पुढील स्लाईडवर वाचा, सत्ताधाऱ्यांनी आत्मपरीक्षण करावे
फोटो - महापालिका आयुक्तांशी चर्चा करताना विरोधी पक्षांचे नगरसेवक पदाधिकारी.