आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कामचुकार अधिका-यांवर कारवाई करू - आ. राम शिंदे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जामखेड - पाणीटंचाईवर मात करण्यासाठी प्रशासनाने सतर्क राहावे. या कामात कामचुकारपण व हलगर्जीपणा करणा-या अधिकारी व कर्मचा-यांवर कारवाई केली जाईल, असा इशारा आमदार राम शिंदे यांनी शनिवारी (28 जून) घेण्यात आलेल्या टंचाई आढावा बैठकीत दिला.

पंचायत समितीच्या सभागृहात आमदार शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली टंचाई आढावा बैठक झाली. बैठकीला पंचायत समितीचे सभापती डॉ. भगवान मुरुमकर, उपसभापती दीपक पाटील, तहसीलदार प्रदीप कुलकर्णी, पंचायत समिती सदस्य शरद कार्ले आदी उपस्थित होते. आमदार शिंदे म्हणाले, सध्या तालुक्यात 19 टँकरद्वारे पाणी पुरवठा होत आहे. आणखी 13 टँकरची मागणी प्रशासनाकडे केली आहे. भुतवडा तलावात शेतीसाठी अनधिकृतपणे होत असलेला पाणी उपसा थांबवून वीजपंपांवर कारवाईचे आदेश द्यावेत. हातपंपांची दुरुस्ती ग्रामपंचायतीने करावी.