आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नऊ तालुके टंचाईग्रस्त; दुष्काळाचे सावट तीव्र

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - नगर जिल्ह्यावर पुन्हा दुष्काळाचे सावट पसरले असून, प्रशासनाने १४ पैकी ९ तालुके टंचाईग्रस्त म्हणून घोषति केले आहेत. या तालुक्यांतील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क माफ करण्यात आले आहे.

सन २००१ मध्ये पावसाने दडी मारल्याने जिल्ह्यात दुष्काळी स्थिती उदभवली होती. दक्षिण भागातील शेती पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे. त्यामुळे दुष्काळाची मोठी झळ शेवगाव, जामखेड, पाथर्डी, कर्जत, श्रीगोंदे या तालुक्यांना बसली होती. बागायत क्षेत्र असलेल्या उत्तरेतील संगमनेर, कोपरगाव, श्रीरामपूर, नेवासे या तालुक्यांतही दुष्काळामुळे गंभीर स्थिती निर्माण झाली होती. टंचाई स्थिती उदभवल्याने ग्रामीण भागात ५०० हून पाण्याचे टँकर सुरू होते. पावसाअभावी खरिपाच्या अवघ्या ५० टक्के पेरण्या झाल्या होत्या. प्रशासनाने अनेक ठिकाणी चारा डेपो सुरू केले होते. या चारा डेपोवर प्रशासनाने कोट्यवधींचा खर्च केला. चारा डेपोंबाबत मोठ्या प्रमाणात तक्रारी आल्याने नंतर प्रशासनाने ते बंद करून जनावरांच्या छावण्या सुरू केल्या होत्या. या छावण्यांत १२ लाखांहून अधिक जनावरे दाखल झाली होती. या छावण्यांवर दररोज १ कोटी खर्च होत होता.

सन २०११ मधील दुष्काळातून जिल्हा सावरत नाही तोच यंदा पुन्हा दुष्काळाचे सावट पसरले आहे. जून, जुलै व ऑगस्ट महनि्यातील पंधरा दिवस कोरडे गेले आहेत. पावसाने हुलकावणी दिल्याने खरिपाच्या पेरण्या रखडल्या असून त्यामुळे शेतकरी धास्तावला आहे.

जिल्ह्यात पावसाची वार्षिक सरासरी ४९७ मिलिमीटर आहे. गेल्या वर्षी २० ऑगस्टपर्यंत ३२३ मिलिमीटर पाऊस झाला होता. यंदा याच कालवधीत १४२.९१ मिलिमीटर पाऊस झाला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा निम्माही पाऊस न झाल्याने ग्रामीण भागात पाण्याची तीव्र टंचाई भासत आहेत. पावसाने दडी मारल्याने ग्रामीण भागातून टँकरबरोबर चार्‍याचीही मागणी वाढू लागली आहे. पाऊस लांबल्याने जिल्हा प्रशासनाने ९ तालुके टंचाईग्रस्त म्हणून जाहीर केले आहेत.
आणेवारी ५० पैशांच्या आत; शेतसारा माफ होणार
पारनेर, कर्जत, शेवगाव, नेवासे, कोपरगाव, राहुरी, पाथर्डी, श्रीरामपूर व राहाता या नऊ तालुक्यांची आणेवारी ५० पैशांच्या आत आहे. त्यामुळे हे तालुके टंचाईग्रस्त म्हणून जाहीर करण्यात आले आहेत. या तालुक्यांतील कृषिपंपांच्या चालू वीजबिलात ३३ टक्के सवलत देण्यात येणार आहे. शालेय वदि्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क माफ करण्यात येणार आहे. शेतसाराही माफ करण्यात येणार आहे.”
अनिल कवडे, जिल्हाधिकारी.