आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कागदावरच उगवला १०.५ लाख टन चारा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - पाऊस लांबल्याने जिल्ह्यात गंभीर दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. सहा लाखांवर लोक टँकरचे पाणी पिऊन तहान भागवत आहेत. चाऱ्याचाही प्रश्न निर्माण झाल्याने छावण्या चारा डेपो सुरू करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाकडे जिल्ह्यात १० लाख ५६ हजार मेट्रिक टन चारा उपलब्ध असल्याची नोंद आहे. गंभीर चाराटंचाई असताना प्रशासनाने कागदावरच चारा उगवल्याची टीका जिल्हा परिषद सदस्यांनी केली आहे. चाऱ्यावरून लोकप्रतिनिधी विरुद्ध अधिकारी असा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

जिल्ह्यातील चाऱ्याचा प्रश्न गंभीर झाल्यानंतर जि. प. पदाधिकारी सदस्यांचे शिष्टमंडळ जिल्हाधिकारी अनिल कवडे यांना भेटले. जिल्ह्यात छावण्या चारा डेपो सुरू करण्याची मागणी या शिष्टमंडळाने केली. तथापि, जिल्ह्यात चारा उपलब्ध असल्याने छावण्या डेपो सुरू करता येणार नसल्याचे कवडे यांनी सांगितले. त्यानंतर राष्ट्रवादीच्या वतीनेही जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन चारा टंचाईकडे लक्ष वेधण्यात आले. जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाकडील आकडेवारीनुसार अकोले, नेवासे राहुरी तालुक्यात सर्वाधिक चारा उपलब्ध आहे. जिल्ह्यात जनावरांची संख्या १६ लाख ४८ हजार ५४९ असून त्यांच्यासाठी हा चारा सप्टेंबरपर्यंत पुरेल, असा अंदाजही प्रशासनाच्या आकडेवारीवरून दिसतो. तालुक्यांत दीड महिनाच उपलब्ध चारा पुरणार आहे. अकोले तालुक्याचा काही भाग वगळता कोणत्याही तालुक्यात समाधानकारक पाऊस झालेला नाही. खरीप हंगाम वाया गेल्याने पिकांच्या माध्यमातून चारा उपलब्ध होण्याची आशाही धूसर झाली. पुरेसा चारा उपलब्ध नसल्याने बहुतांश शेतकऱ्यांना दुष्काळात जनावरे जगवण्याची कसरत करावी लागत आहे. त्यातच चाऱ्याचे भाव वाढल्याने पशुपालक आर्थिक संकटात सापडला आहे. त्यामुळे छावण्या डेपो सुरू करण्याची मागणी होत आहे.

प्रशासनाकडे सादर केली जाणारी माहिती चुकीची असून कागदावरच चारा उगवण्याचा प्रताप झाला आहे. त्याचा फटका पशुपालक शेतकऱ्यांना बसला आहे, अशी टीकाही जि. प. सदस्य करत आहेत. छावण्या सुरू झाल्या नाहीत, तर प्रशासन विरुद्ध लोकप्रतिनिधी असा वाद सुरू होण्याची शक्यता आहे.

अशी आहे चाऱ्याची गरज
पशुसंवर्धनविभागाच्या माहितीनुसार लहान जनावरांसाठी दररोज वाळलेला चारा किलो ओला चारा किलो आणि मोठ्या जनावरांना वाळलेला चारा किलो ओला चारा १५ किलो आवश्यक आहे. त्यानुसार जिल्ह्यात दरमहा लाख ७७ हजार ९३२ मेट्रिक टन चाऱ्याची गरज भासते.

तालुका निहाय चारा जनावरे (चारा टनांत)
अकोले-१,१२,४९७ - १,००,७८०
संगमनेर - ७०,९५० - १,९२,२०२
कोपरगाव - ७७,२८६ -६९,६०८
राहाता - ८५,४५० -७८,८१४
नगर - ४८,२८१ - १,३१,२१५,
पारनेर - ५१,४२७ - १,३७,४९६
कर्जत - ४३,९१६ - १,१७,५२९
जामखेड - २९,४१८ - ८०,१६६
श्रीगोंदे - ६,०३,३९ -१,६१,८९४
राहुरी - १,४९,८१३ -१,३४,४३९
पाथर्डी - ४६,५३२ -१,२५,५५८
श्रीरामपूर -८९,६०१ - ८०,५९४
नेवासे - १,५२,५९२ - १,३६,१४८
शेवगाव - ३८,१७० - १,०१,८४२

चारा प्रत्यक्षात नाही
^सध्या जनावरांसाठी चारा पिण्याचे पाणी नाही. प्रशासनाचा चारा कागदावर उगवल्याचे दिसते. प्रशासनाने दिलेली माहिती खोटी आहे. ऊस हे चारापीक नाही, पण पर्याय नसल्याने त्याचा वापर केला जात आहे. त्यामुळे छावण्या चारा डेपो सुरू करावेत.'' बाळासाहेबहराळ, सदस्य, जिल्हा परिषद.