आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वीस दिवसांत जिल्ह्यात तब्बल ३६९ टँकर बंद

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - परतीच्या दमदार पावसामुळे जिल्ह्यातील पाणीटंचाईचे संकट कमी झाले आहेत. गेल्या २० दिवसांत जिल्ह्यातील तब्बल ३६९ पाणी टँकर जिल्हा प्रशासनाने बंद केले. जिल्ह्यात गेल्या वर्षी जून ते ऑगस्ट या कालावधीत ७१ टक्के पावसाची नोंद झाली होती. कमी प्रमाणात झालेल्या पावसामुळे जानेवारी महिन्यापासूनच पाण्याची टंचाई निर्माण झाली होती. कमी पावसामुळे ग्रामीण भागातून टँकरची मागणी वाढू लागली होती. फेब्रुवारी ते जून अखेरपर्यंत ४७० टँकरवर संख्या गेली होती. जूनपासून पावसाला सुरुवात झाल्याने प्रारंभी टँकरची संख्या काही प्रमाणात घटली होती. मात्र, १५ जूनपासून पावसाने दडी मारल्याने टँकरच्या संख्येत ऐन पावसाळ्यात वाढ होत गेली.
सप्टेंबरपर्यंत जिल्ह्यात टँकरची संख्या ५२१ वर गेली
तब्बल लाख नागरिकांना टँकरच्या पाण्यावर आपली तहान भागवावी लागत होती. मात्र, जिल्ह्यात सप्टेंबरपासून परतीच्या पावसाला सुरुवात झाल्याने ही टँकरची संख्या कमी होत गेली. गेल्या वीस दिवसांत ३६९ पाणी टँकर बंद झाले आहेत. पाथर्डी तालुक्यात सप्टेंबरला सर्वाधिक १०१ पाणी टँकर सुरू होते.त्याखालोखाल पारनेर तालुक्यात ८० कर्जत जामखेड तालुक्यांत ५६ पाणी टँकर सुरू होते. पाथर्डी तालुक्यातील टँकरची संख्या आता १४ झाली असून पारनेरला ही संख्या २७ झाली आहे. नगर जिल्ह्यातील संगमनेर (२५), कोपरगाव (१), नेवासे (३), राहाता (१), नगर (१४), शेवगाव (१६), कर्जत (१६), जामखेड (१५) श्रीगोंदे (२) येथे पाणी टँकर सुरू आहेत. वीस दिवसांपूर्वी जिल्ह्यातील तब्बल लाख नागरिक टँकरच्या पाण्यावर अवलंबून होते. आता ही संख्या लाख ८६ हजार ४६० झाली आहे.
परतीच्या पावसामुळे विहिरी, कूपनलिका, छोटे बंधारे पाण्याने भरल्याने पिण्याच्या पाण्याबरोबर चाऱ्याचा प्रश्नही कमी झाला आहे.जिल्ह्यात आतापर्यंत ७०.५१ टक्के पावसाची नोंद झालेली आहे. दोन महिन्यांपूर्वी केवळ ३० टक्के पावसाची नोंद झालेली होती. २० दिवसांत ४० टक्के जास्त पाऊस झाला आहे. दमदार पावसामुळे शेतकऱ्यांनी रब्बी हंगामातील पेरण्यांना सुरुवात केली. या पावसाने रब्बीच्या उत्पादनात वाढ होईल, असा कृषी विभागाचा अंदाज आहे. त्यासाठी कृषी विभागाने अतिरिक्त बियाणे खतांचे नियोजन केले आहे.रब्बीत दुबार पेरणीचे संकट आल्यास त्या शेतकऱ्यांना मोफत बी-बियाणे खते दिली जाणार आहेत.

कर्जतला टंचाई
संगमनेर,कर्जतला टंचाईचे संकट कायम नगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात पावसाने सरासरी आेलांडली आहे. अकोले तालुक्यात सरासरीपेक्षा २०० मिलिमीटर अधिक पाऊस झाला आहे. जिल्ह्यात संगमनेर कर्जतवगळता अन्य तालुक्यांमध्ये चांगला पाऊस झाला आहे. त्यामुळे या दोन तालुक्यांत टंचाईचे संकट कायम आहे.

मुळातील पाणीसाठा ६० टक्क्यांवर
गेल्यावीस दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाचा जोर मागील सहा दिवसांपासून कमी झाला आहे. परतीच्या पावसामुळे धरणांतील पाणीसाठ्यात काही प्रमाणात वाढ झाली आहे. नगर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मुळा धरणात शनिवारअखेरपर्यंत ६०.१० टक्के पाणीसाठा होता.