आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दीड लाख लोकांना टँकरने पाणीपुरवठा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - अवकाळी पावसानंतरही पाणी टंचाईचे संकट कायम अाहे. ऐन हिवाळ्यात लाख ६७ हजार नागरिकांना ९१ टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे. महिन्याभरात २२ टँकर वाढले आहेत. डिसेंबरनंतर टंचाईचे संकट आणखी वाढण्याची चिन्हे आहेत.

अवकाळी पावसामुळे पाण्याच्या पातळीत काही अंशी वाढ झाली असली, तरी ती तात्पुरत्या स्वरुपाची आहे. पाणी टंचाईचे संकट पावसानंतरही कायम आहे. यंदा नोव्हेंबरपासूनच टँकरची मागणी वाढू लागली अाहे. नोव्हेंबरपर्यंत जिल्ह्यात अवघे ६७ टँकर सुरु होते. मात्र, आता ही संख्या ९१ वर गेली आहे. पाण्याखालचा भाग असलेल्या नेवासे तालुक्यात सर्वाधिक २२ टँकर सुरु आहेत. गेल्या वर्षी डिसेंबरपासून टँकरला मागणी सुरु झाली होती. मे अखेरपर्यंत टँकरची संख्या ४७५ वर गेली होती. पुढे ते १५ जूनदरम्यान चांगला पाऊस झाला. त्यानंतर मात्र पावसाने विश्रांती घेतली. त्यानंतर तब्बल तीन महिने पावसाने पाठ फिरवली होती. त्यामुळे टँकरच्या मागणीत पुन्हा वाढ होऊ लागली. सप्टेंबर महिन्यात जिल्ह्यात लाख नागरिकांना तब्बल ५२१ टँकरने पाणी पुरवठा सुरु करण्यात आला होता. पाथर्डी, पारनेर तालुक्यात सर्वाधिक टँकर सुरु होते.

तीन महिन्यांच्या विश्रांतीनंतर सप्टेंबरपासूनच परतीच्या पावसाला सुरुवात झाली. या पावसामुळे पाणी साठ्यांत वाढ झाली. त्यामुळे टँकरची संख्या कमी होऊ लागली. ३० ऑक्टोबरअखेर ४५४ टँकर प्रशासनाने बंद केले. केवळ ६७ टँकर सुरु होते. तथापि, गेल्या पंधरा दिवसांपासून टँकरच्या मागणीत पुन्हा वाढ होऊ लागली आहे. गेल्या पंधरा दिवसांत १५ टँकर वाढले आहेत. २५ नोव्हेंबरपर्यंत टँकरची संख्या ९१ वर जाऊन पोहोचली. जिल्ह्यातील ६६ गावे २८८ वाड्या-वस्त्यांवरील लाख ६७ हजार ४६४ नागरिकांना टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे.

नेवासे तालुक्यात २२ संगमनेर तालुक्यात १८ टँकर सुरु आहेत. नेवासे तालुक्यातील १७ गावे ३८ वाड्या-वस्त्यांवरील ४४ हजार ४४५ नागरिकांना २२ टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे. संगमनेर तालुक्यातील ११ गावे ९६ वाड्या-वस्त्यांवरील ३३ हजार ९९२ नागरिकांना १८ टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे. अकोले, कोपरगाव, श्रीरामपूर राहाता तालुक्यांमध्ये मात्र अजून टँकर सुरु झाले नसले, तरी येत्या काही महिन्यांमध्ये या भागातही टँकर सुरु होणार आहेत. टंचाईची स्थिती लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने आतापासूनच उपाययोजना सुरु केल्या असून, ज्या पाणी पुरवठा योजना थकीत वीजबिलामुळे बंद झाल्या आहेत, त्या योजना महिन्याभरात सुरु करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे.

फेब्रुवारी महिन्यापासून चाऱ्याचा प्रश्न गंभीर होणार
चार दिवसांपूर्वी झालेल्या अवका‌ळी पावसामुळ‌े काही प्रमाणात चाऱ्याचा प्रश्न कमी झाला असला, तरी फेब्रुवारीपासून चाऱ्याची मागणी वाढणार आहे. चारा टंचाई वाढल्यास प्रशासन चारा छावण्यांचा प्रस्ताव शासनाकडे सादर करणार आहे. गेल्या मे महिन्यात चारा छावण्या सुरु होणार होत्या. मात्र, परतीच्या पावसामुळे या छावण्या बारगळल्या होत्या.

शासकीय टँकरची टंचाई
लाखो नागरिकांना पाणी पुरवठा करण्याची जबाबदारी असलेल्या जिल्हा प्रशासनाकडे गेल्या अनेक महिन्यांपासून टँकरची टंचाई आहे. जिल्हा प्रशासनाकडे एकूण २२ टँकर आहेत. त्यापैकी सध्या १५ टँकर सुरू आहेत. उर्वरित ७६ टँकर खाजगी आहेत.