आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Water Project Villages Bhende Kukane Hit Shortage

भेंडे-कुकाणे पाणी योजनेच्या गावांना बसणार टंचाईची झळ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नेवासे फाटा - भेंडे-कुकाणे नळपाणी पुरवठा याेजनेच्या पाणी साठवण तलावातून नेवासे तालुक्यातील २८ गावांची तहान टॅँकरने पाणी उपसा करून भागवली जात असल्याने येत्या २० ते २५ दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा या तलावात शिल्लक राहणार आहे. यामुळे भेंडे-कुकाणेसह या याेजनेखालील सहा गावांना १० एप्रिल नंतर पिण्याच्या पाण्याची टंचाई भासणार अाहे. सरकारी यंत्रणेला त्यामुळे अातापासूनच या याेजनेतील पाणीप्रश्नाकडे गांभीर्याने बघावे लागणार अाहे.

भेंडे कुकाणेसह भेंडे खुर्द तरवडी चिलेखनवाडी अंतरवाली या सहा गावांसाठी जीवन प्राधिकरणाने कायमस्वरूपी नळपाणी पुरवठा कार्यान्वित करून ती ग्रामपंचायतींकडे हस्तांतरित केेली अाहे. या याेजनेसाठी भेंडे बुद्रुक येथे साठवण तलाव बांधण्यात अालेला अाहे. या तलावात मुळा धरणातील पाणी पिण्यासाठी साेडल्यानंतर याेजनेखालील वरील सहाही गावांना तीन महिने पुरेल इतकाच पाणीसाठा केला जात असताे. मात्र अाता या तलावातील पाण्यावर तालुक्यातील २८ गावांसाठीच्या २८ टॅँकरच्या दरराेजच्या दाेन-तीन खेपांचा भार पडल्याने या तलावात गेल्या अाठ दिवसांपूर्वीच साेडलेल्या मुळा धरणातील पाण्याचा साठा अाता थोडाच शिल्लक आहे. दरराेज सुमारे सात लाख लिटर्सहून अधिक पाणी सध्या टॅँकरने या तलावातून उपसले जात अाहे. टॅँकर खेपांची संख्या वाढतच असल्याने या याेजनेचा पाणीसाठा घटत अाहे.

टंचाई जाणवणार नाही, याची काळजी घ्यावी
इतर गावांना पाणी देण्यास हरकत नाही. पण या याेजनेखालील गावांत पाणीटंचाई भासणार नाही. याची जबाबदारी सरकारी यंत्रणेला घ्यावी लागेल. या याेजनेच्या देखभालीसाठी सरकारने निधी द्यावा, त्यामुळे पाणीपुरवठ्यात व्यत्यय येतो. अपूर्वा गर्जे, ग्रामपंचायत सदस्य, कुकाणे.

योजनेवर या गावांच्या पाणीपुरवठ्याचा भार
नारायणवाडी, तेलकुडगाव, हंडीनिमगाव, धनगरवाडी, माेरेचिंचाेरे, माका, वडाळा बहिराेबा, तामसवाडी, वाटापूर, वडूले चांदे, म्हाळसपिंपळगाव, राजेगाव, लाेहगाव, जेऊरहैबती, पिंप्रीशहाली, रांजणगाव, सुकळी, नवीन चांदगाव, देवसडे, पाथरवाले, नजिकचिंचाेली, शिंगवे तुकाई, गोंडेगाव, म्हसले, महालक्ष्मीहिवरे, हिंगाेणी वनांदूर शिकारी या गावांसह वाड्यांचा भार या पाणीपुरवठा योजनेवर आहे.

वीस दिवसांनंतर पाटपाणी साेडणार
या भेंडे-कुकाणेनळपाणी पुरवठा याेजनेच्या पाणी साठवण तलावामध्ये मुळा धरणाचे पाणी साेडण्यासाठी पाटबंधारे विभागाशी बाेललाे अाहे. आगामी वीस दिवसांनंतर या योजनेच्या साठवण तलावामध्ये पाटपाणी साेडले जाणार अाहे. तलावातील पाण्याचा अंदाज घेऊन त्यात पाटबंधारे विभागाकडून पाणी साेडले जाणार अाहे. नामदेव टिळेकर, तहसीलदार नेवासे.