आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ठेकेदार तापी प्रिस्टेज पीएमसी "काम बंद'च्या भूमिकेवर ठाम

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - शहर सुधारित पाणीपुरवठा योजनेचे (फेज टू) काम बंद होऊन तब्बल २० दिवस उलटले. त्यामुळे टीकेचे धनी झालेले मनपा प्रशासन सत्ताधारी हतबल झाले आहेत. काम सुरू असल्याचा दावा महापौर संग्राम जगताप यांनी केला असला, तरी ठेकेदार संस्था तापी प्रिस्टेज प्रकल्प व्यवस्थापन समितीने (पीएमसी) हा दावा धुडकावून लावला. जोपर्यंत थकीत बिले मिळत नाहीत, तोपर्यंत काम सुरू करण्याचा निर्णय दोन्ही संस्थांनी घेतला आहे. त्यामुळे हा तिढा कसा सोडवायचा, असा प्रश्न प्रशासन सत्ताधाऱ्यांसमोर उभा आहे.
मनपाकडून सहकार्य मिळत नसल्याने "तापी'ने ३१ मार्चपासून फेज टूचे काम थांबवले. त्यापाठोपाठ पीएमसी म्हणून काम पाहणाऱ्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाच्या समितीनेही काम थांबवले. ठेकेदार संस्थेचे नऊ कोटींची सहा बिले पीएमसीचे २५ लाख मनपाने थकवले आहेत. थकीत बिले मिळत नाहीत, तोपर्यंत काम सुरू करणार नसल्याचे ठेकेदाराचे प्रकल्प व्यवस्थापक आय. सी. मेहता पीएमसीच्या कार्यकारी अभियंत्या सुनंदा नरवडे यांनी स्पष्ट केले.
विरोधकही याप्रश्नी आक्रमक झाले आहेत. आठ दिवसांत योजनेचे काम पुन्हा सुरू झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा विरोधी पक्षनेते संजय शेंडगे, नगरसेवक अॅड. अभय आगरकर, अनिल शिंदे आदींनी दिला आहे. त्यामुळे सत्ताधाऱ्यांनी काम पुन्हा सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. काम सुरू केल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी ठेकेदार संस्थेवर असेल, असे पत्र प्रशासनाने दिले आहे. मात्र, ठेकेदाराने त्याची दखल घेता मनपाच्या विरोधात न्यायालयात जाण्याची तयारी सुरू केली आहे. त्यामुळे काम बंद होऊन २० दिवस उलटले, तरी फेज टूचा तिढा कायम आहे.

दुसरी ठेकेदार संस्था नेमल्यास खर्च वाढणार

११६कोटींच्या फेज टू योजनेचे साडेचार वर्षांत केवळ ४० ते ५० टक्के काम पूर्ण झाले आहे. सध्याच्या ठेकेदार संस्थेने बंद केलेले काम पुन्हा सुरू केल्यास उर्वरित कामासाठी प्रशासनाला पुन्हा निविदा काढावी लागेल. मात्र, अर्धवट काम करण्यास ठेकेदार संस्था मिळेल की नाही, हा मोठा प्रश्न आहे. ठेकेदार संस्था मिळाली, तरी साडेचार वर्षांनंतर योजनेच्या कामाचा खर्च मोठ्या प्रमाणात वाढणार आहे.