आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्ह्यात बसवणार पाणी शुद्धीकरण यंत्र

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - जैविक घटकांनी बाधित असलेल्या गावात पिण्यायोग्य पाणी नसल्याने अनेक गावांना वर्षानुवर्षे टँकरने पाणीपुरवठा केला जातो. पण ही अडचण सोडवण्यासाठी राज्यातील नगरसह दहा जिल्ह्यांतील पाणी योजनांना पाणी शुद्धीकरण यंत्रे बसविण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. या उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील पाच गावांची निवड होणार आहे.

ग्रामीण भागात शुद्ध पाणीपुरवठा व्हावा, यावर राज्य सरकार मोठा खर्च करत आहे. शुद्ध पिण्याच्या पाण्याची जबाबदारी ग्रामपंचायतीवर असली, तरी अन्य बाबींसाठी पाणी स्वच्छता विभाग, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग आरोग्य विभाग कार्यरत आहे. पाण्यामध्ये आढळणाऱ्या इकोलाय पोलिफाम या जैविक घटकांचा समावेश असलेले पाणी पिण्यायोग्य मानले जात नाही. नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, नगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर या दहा जिल्ह्यांमध्ये जैविक घटकांमुळे बाधित असलेल्या गावांमध्ये पाणीपुरवठा योजनांना पाणी शुद्धीकरण यंत्रे बसविण्यात येणार आहेत.

ज्या गावांची लोकसंख्या तीन ते चार हजार आहे, अशाच गावाची या उपक्रमांतर्गत निवड होणार आहे. अशा गावांची नावे, दोन दिवसांत कळवण्याचे आदेश पाणी स्वच्छता विभागाच्या संचालकांनी, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या मुख्य अभियंत्यांसह जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता यांना कळवले आहे. पण जिल्हा परिषद या आदेशाबाबत अनभिज्ञ असल्याचे समोर आले आहे.
बातम्या आणखी आहेत...