आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

"मुळा'चा विसर्ग उद्या सकाळी थांबणार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - मुळाधरणातून जायकवाडीला सुरू असलेला पाण्याचा विसर्ग सोमवारी (१५ डिसेंबर) सकाळी थांबवण्यात येणार आहे. गोदावरी खोरे विकास महामंडळाच्या आदेशानुसार मुळातून ३.६ टीएमसी पाणी जायकवाडीला सोडण्यात येणार आहे. शनविारी सायंकाळपर्यंत पावणेतीन टीएमसी पाणी जायकवाडीकडे गेले.
जिल्ह्यातील धरणांमधून जायकवाडीसाठी पाणी सोडण्याचे आदेश प्राप्त झाल्यानंतर पाटबंधारे विभागाने मुळा धरणातून डिसेंबरला पाणी सोडण्यास सुरुवात केली, तर भंडारदरातून एक दविस अगोदर विसर्ग सुरू झाला. मुळा धरणातून जायवाडीला ३.६ टीएमसी (३६०० दशलक्ष घनफुट) पाणी सोडण्यासाठी पाच दविस विसर्ग सुरू ठेवण्याचे नियोजन करण्यात आले होते. मात्र, नदीपात्रावरील बंधाऱ्यांचे दरवाजे काढण्यास झालेल्या विलंबामुळे नियोजन लांबले. शनविारी सायंकाळी वाजता मुळातून २७७० दशलक्ष घनफुट पाणी जायकवाडीकडे गेले आहे. आदेशाप्रमाणे आणखी पावणेआठशे दशलक्ष घनफुट पाणी सोडणे आवश्यक आहे. सोमवारी सकाळपर्यंत आदेशाप्रमाणे पाणी सोडण्याची प्रक्रिया पूर्ण करून विसर्ग बंद करण्याचे नियोजन पाटबंधारे विभागाकडून करण्यात आले आहे. दरम्यान, केवळ नगर जिल्ह्यातील धरणातूनच पाणी सोडण्याचे आदेश का देण्यात आले, याचा खुलासा अजूनही झालेला नाही.