आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गाेदावरी कालव्यांतून रविवारपासून अावर्तन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शिर्डी - गाेदावरी लाभक्षेत्रातील शेतक-यांनी पिण्याबराेबरच शेतीच्या पाण्यासाठी अावर्तन देण्याच्या मागणीचे गांभीर्य लक्षात घेऊन गाेदावरी कालव्यातून पाणी साेडण्याचा निर्णय शुक्रवारी मुंबई येथे झालेल्या बैठकीत घेण्यात अाला. हे पाणी अावर्तन रविवारपासून साेडण्याचा निर्णय घेण्यात अाला.

या बैठकीस जलसंपदामंत्री गिरीश महाजन, विराेधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, पालकमंत्री राम शिंदे, अामदार स्नेहलता काळे उपस्थित हाेते. गाेदावरी नदीतून शेतीसाठी पाणी अावर्तन मिळावे, यासाठी लाभक्षेत्रातील शेतक-यांची मागणी हाेती. उन्हाची वाढती तीव्रता, पाण्याची खालावलेली पातळी, याचबराेबर शेतीपिकांना पाणी अावश्यक असल्याने गंभीर प्रश्न निर्माण झाला हाेता. याचबराेबर जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न जटिल बनला हाेता.
यासाठी विराेधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी जलसंपदा विभागाकडे मागणी केली हाेती. यासाठी मंत्रालयात याबाबत बैठक हाेऊन पाणी साेडण्याचे नियाेजन करण्यात अाले. हे पाणी पिण्यासह शेतीसाठीही उपयाेगात येणार अाहे. बैठकीत ठरल्यानुसार हे पाणी अावर्तन रविवारपासून साेडण्याचा निर्णय झाला अाहे.
बातम्या आणखी आहेत...