आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Water Release From Mula Dam, Thursday Come In Jayakwadi

मुळा धरणातून पाणी झेपावले, गुरुवारी जायकवाडीत!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर / औरंगाबाद - जायकवाडीला पाणी सोडण्याच्या नियोजनात बदल करत चोख बंदोबस्तात सोमवारी मुळा धरणातून पाणी सोडले. ३००० क्युसेक वेगाने मुळा नदीत विसर्ग सुरू असून, पाच-सहा दिवसांत ३.५ टीएमसी पाणी सुटेल. भंडारदरातून २८०० क्युसेकने निळवंडेसाठी प्रवरा नदीत रविवारपासून विसर्ग सुरू आहे. निळवंडे भरल्यानंतर मंगळवारी रात्रीपर्यंत जायकवाडीकडे पाणी झेपावेल. भंडारदरा व निळवंडेतून ४.३ टीएमसी पाणी सोडले जाईल. दरम्यान, मूळाचे पाणी गुरुवारपर्यंत, तर भंडारदराचे ९ ते १० दिवसांनी जायकवाडीत पोहोचेल, असे गोदावरी पाटबंधारे विकास महामंडळाचे अधिक्षक अभियंता ग.प्र.वझे यांनी सांगितले.

सर्वांना हुलकावणी...
पाणी सोडण्याच्या विरोधात सोमवारी आंदोलनांनी नगर जिल्हा दणाणून सोडला. पाटबंधारे विभागाने वरिष्ठ कार्यालयाचा हवाला देऊन पाणी सोडले. मंगळवारी मुळातून पाणी सोडण्याचे ठरले होते, परंतु विरोध लक्षात एक दिवस अगोदरच मुळातून आवर्तन सुरू करण्यात आले.
बंधा-याच्या फळ्या काढल्या : मुळातून चार, सहा आणि आठ मो-यांद्वारे जायकवाडीकडे पाणी झोपावले. मुळा नदीवरील डिग्रस, मानोरी, वांजूळ पोटी, मांजरी येथील कोल्हापूर पद्धतीच्या बंधा-यावरील फळ्या काढण्यात आल्या.

५-६ दिवस विसर्ग
मुळातून जायकवाडीसाठी सोडण्यात आलेले पाणी पाच ते सहा दिवस सुरू राहणार आहे. पाटबंधारे विभागासह महसूल, पोलिस यंत्रणेला यासंदर्भात सतर्क करण्यात आले आहे.
दिलीप नवलाखे, उपअभियंता, मूळा

पात्रानुसार वेग
टप्याटप्याने पाणी सोडणे गरजेचे असते. त्यामुळे ते नदीपात्राबाहेर जात नाही. हानीचीही काळजी घ्यावी लागते. पाणी ऑक्टोबरमध्येच सोडायला गरजेचे होते. पण उशीर झाला.
पी. माण्णीकर, निवृत्त अभियंता

कडेकोट पोलिस बंदोबस्त : मुळा धरणावर कडेकाेट बंदोबस्त आहे. त्यात पोलिस निरीक्षक, ७ उपनिरीक्षक, ५५ पोलिस, पाटबंधारे कर्मचारी बंदोबस्तावर तैनात आहे.