आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Water Released From The Mula Dam For The Drinking

मुळा धरणातून पिण्यासाठी आवर्तन सोडले

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - मुळा धरणाच्या उजव्या कालव्यातून पिण्याच्या पाण्यासाठी बुधवारी (10 एप्रिल) सकाळी आवर्तन सोडण्यात आले. कालव्यातून 500 क्युसेक्सने पाणी सोडण्यात आले आहे. 10 दिवस हे आवर्तन चालणार आहे. मागील अनेक दिवसांपासून पिण्यासाठी पाणी सोडण्याची मागणी होत होती. पिण्यासाठी 1 हजार दशलक्ष घनफूट पाणी लागणार आहे. दुष्काळात धरणातील पाणी फक्त पिण्यासाठी राखीव ठेवण्यात आले आहे. या आवर्तनातून राहुरी विद्यापीठ, सडे, पिंप्री, उंबरे, ब्राम्हणी, वांबोरी, सोनई, भेंडा, कुकाणा, नेवासे, शेवगाव, पाथर्डी या गावांना पिण्याचे पाणी मिळणार आहे.