आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

34 गावे व 117 वाड्यांना टँकरने पाणी

11 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - सध्या जिल्ह्यातील 34 गावे व 117 वाड्यांना 26 शासकीय व 8 खासगी टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. गरजेनुसार आणखी टँकरची व्यवस्था करण्यात येईल, अशी माहिती कार्यकारी अभियंता एस. सी. निकम यांनी दिली.फेब्रुवारीमध्येच बहुतांशी तलाव व विहिरींनी तळ गाठल्याने तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे जिल्हाभरातून पाण्यासाठी ठणठणाट होत आहे. लोकांबरोबरच पशुधनासाठी लागणा-या पाण्याचा विचार करून टँकरची व्यवस्था करावी या मागणीने जोर धरला आहे. आठ दिवसांपूर्वीच पाणी वाहतुकीचा ठेका हर्षवर्धन सहकारी संस्थेला देण्यात आला आहे. त्यामुळे आता टँकरची संख्या वाढेल अशी अपेक्षा सामान्य नागरिकांमधून व्यक्त होत आहे. टँकरची तालुकानिहाय संख्या : संगमनेर 12, पारनेर 8, कर्जत 8, अकोले 1, पाथर्डी 2, नगर 3.