आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मु‌ळा धरणात आज नवे पाणी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - जलि्ह्यातील सर्वात मोठे असलेल्या मुळा धरणात गुरुवार पासून (२५ जून) नवीन पाण्याची आवक होण्याची शक्यता आहे. पाणलोट क्षेत्रातील कोतूळमध्ये बुधवारी झालेल्या जोरदार पावसामुळे नदीपात्रातून ८३७३ क्युसेक्स वेगाने पाणी पुढे झेपावत आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा पंधरा दिवस अगोदरच नवीन पाण्याची आवक धरणात होत आहे.

मुळा धरणाने सध्या तळ गाठला आहे. धरणात अवघा पावणेदोन टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे. गेल्या वर्षी उशिरा आलेल्या पावसाने पाणलोट क्षेत्रात दमदार हजेरी लावली. त्यामुळे धरण ९६ टक्क्यांपेक्षा अधिक भरले. पाणी योजना, सिंचनाचे पाणी, व्यय याबरोबरच जायकवाडीसाठी सोडाव्या लागलेल्या पाण्यामुळे धरणातील उपयुक्त साठा पावसाळ्याच्या तोंडावर खालावला. लाभक्षेत्रात सुरुवातीला समाधानकारक हजेरी लावलेल्या पावसाने दडी मारली असून दमदार पावसाभावी खरिपाच्या पेरण्या खोळंबल्या आहेत, तर दुसरीकडे पाणलोट क्षेत्रात बुधवारी सकाळपर्यंत यंदाच्या मोसमातील ९१ मिलिमिटर पावसाची नोंद झाली होती. त्यात १९२ दशलक्ष घनफूट क्षमतेचे आंबित धरण भरून नदी वाहती झाली.

बुधवारी सकाळपासून कोतूळ परिसरात धुव्वाधार पावसाला सुरुवात झाली आहे. परिणामी दुपारी तीनच्या सुमारास कोतूळ परिसरात ८३७३ क्युसेक्स वेगाने नदीपात्रातून पाणी वाहण्यास सुरुवात झाली. १२०० दशलक्ष घनफूट क्षमता असलेल्या पिंपळगाव खांड धरण पार करून गुरुवारी मुळा धरणात नवीन पाण्याची आवक शक्य असल्याचे पाटबंधारे विभागाकडून सांगण्यात येत आहे. पिंपळगाव खांड धरणात यंदा अर्धा टीएमसीच (५०० दलघफू) पाणी साठण्याची शक्यता आहे. बुधवारच्या जोरदार पावसाने पाण्याचा वेग वाढला असून पाणी धरणाकडे झेपावत आहे.

गेल्या वर्षी १२ जुलैला सुरू झाली होती धरणात आवक
गेल्यावर्षी मुळा धरणात नवीन पाण्याची आवक सुरू होण्यासाठी १२ जुलैची वाट पहावी लागली होती. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा पंधरा दिवस आधीच नवीन पाण्याची आवक होत असून ही लाभक्षेत्राला दलिासा देणारी बाब आहे. गेल्या वर्षी सुरुवातीला ५०० ते ५५० क्युसेक्स वेगाने पाण्याची आवक होती. यंदा मात्र मोठ्या वेगाने पाणी येत आहे. पावसाचा जोर कायम राहलि्यास धरणातील साठा झपाट्याने वाढणार आहे. त्यामुळे पिण्याच्या पाणी योजनांपुढील प्रश्न सुटण्यास मदत होईल.

- ८३७३ - क्सुसेक्स वेग
- ९१ - मिमी पाणलोट क्षेत्रातील पाऊस
- ४८७९ - दलघफू धरणातील साठा
- ३७९ - दलघफू उपयुक्त पाणीसाठा

गेल्या वर्षीच्या तुलनेत पाण्याचा वेग जास्त
कोतूळपरिसरात जोरदार पाऊस सुरू आहे. परिणामी मुळा नदीपात्रातून वेगाने पाणी वाहते झाले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा पाण्याचा वेग प्रचंड असल्याने लवकरच धरणात नवीन पाण्याची आवक होणार आहे.'' आर.एम. कांबळे, कनिष्ठ अभियंता.
बातम्या आणखी आहेत...