आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाणीपुरवठा विस्कळीत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - मुळानगर पम्पिंग स्टेशनवरील ५६० अश्वशक्तीच्या मोटार पॅनेलचा बुधवारी रात्री स्फोट होऊन शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू असले, तरी गुरुवारी दिवसभर मुळानगरमधून होणारा पाणीउपसा बंद होता. त्यामुळे शहरातील विविध भागात गुरुवारी पाणीपुरवठा होऊ शकला नाही.

वीजपुरवठा खंडित झाल्याचे कारण पुढे करत शहराला पुरेसा वेळेत पाणीपुरवठा करण्यास मनपा असमर्थ ठरली अाहे. वारंवार विस्कळीत पाणीपुरवठ्यामुळे नगरकर हैराण झाले आहेत. मोटार पॅनेलमध्ये स्फोट झाल्याने गुरुवारी शहराचा पाणी पुरवठा पुन्हा एकदा नेहमीप्रमाणे विस्कळीत झाला. मनपाच्या पाणीपुरवठा विभागाने पनेल दुरुस्तीचे काम करणाऱ्या एमआयडीसी येथील तज्ज्ञांना बोलावून तत्काळ दुरुस्तीचे काम सुरू केले. दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतर टप्प्याटप्प्याने पाणीउपसा पुन्हा सुरू करण्यात आला आहे. परंतु दिवसभर पाणीउपसा बंद असल्याने शहराच्या मध्यवर्ती भागाला पाणीपुरवठा करणाऱ्या टाक्या भरता आल्या नाहीत. झेंडीगेट, आडते बाजार, रामचंद्र खुंट, कलेक्टर कचेरी, माळीवाडा, खिस्तगल्ली, मंगलगेट, बेलदारगल्ली, दाळमंडई, कोठी, नटराज चौक आदी भागात गुरुवारी रोटनेशननुसार पाणीपुरवठा होऊ शकला नाही. या भागातील नागरिकांची गैरसोय होऊ नये, यासाठी महापौर अभिषेक कळमकर यांच्या आदेशानुसार शुक्रवारी या भागात पाणीपुरवठा करण्यात येणार आहे.