आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा पालकमंत्र्यांना घेराव

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
राशिन - रास्ता रोको करूनही हक्काचे कुकडीचे पाणी राशीन चिलवडी उपचारीला मिळत नसल्याच्या निषेधार्थ सोमवारी पालकमंत्री राम शिंदे यांना कर्जतमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे घेराव घालण्यात आला.
राशीन आणि चिलवडीला कुकडीची उपचारी आहे. तिला पाणी मिळाले नसल्याने ३० ऑगस्टला राशीन येथे परिसरातील शेतकरी आणि नागरिकांनी रास्ता रोको आंदोलन केले. त्यावेळी कुकडीच्या अधिकाऱ्यांनी लवकरात लवकर पाणी मिळेल, असे आश्वासन दिले होते. मात्र, पाणी मिळाले नाही. सोमवारी पालकमंत्री शिंदे कर्जतच्या दौऱ्यावर आले असता राष्ट्रवादीतर्फे त्यांना घेराव घालण्यात आला. सर्वच नेत्यांनी शिंदे यांना धारेवर धरले. आपण सत्तेत असूनही कर्जत आणि राशीनकरांना हक्काचे पाणी मिळत नसल्याचा आरोप राष्ट्रवादीच्या नेत्यांनी करत आम्हाला हक्काचे पाणी कधी मिळेल?आपण नागरिकांच्या भावनेशी खेळत आहात. परिसरात पावसाचे प्रमाण अल्प असून शेती आणि पशुधन अडचणीत आहे, चाऱ्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. आंदोलन करूनही आपण दखल घेत नाही, असे म्हणत पालकमंत्र्यांचा ताफा अडवला. पाणी मिळाल्यास पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा राष्ट्रवादीचे शहाजी राजेभोसले यांनी पालकमंत्र्यंाना दिला. यावेळी अॅड. सुरेश शिंदे, फिरोज पठाण, पंचायत समिती सदस्य संग्राम पाटील, ज्ञानेश्वर सायकर, मालोजी भिताडे, नितीन धांडे, डॉ. विलास राऊत अादी उपस्थित होते.
कुकडीच्या पाण्यासाठी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी पालकमंत्र्यांना घेराव घातला.

पाणी मिळाल्यास आत्मदहनाचा इशारा
राशीन परिसरातील शेतकऱ्यांची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. राशीन आणि चिलवडी उपचारीला कुकडीचे हक्काचे पाणी मिळाल्यास आपण मुंबईत जलसंधारण मंत्र्यांच्या दालनासमोर आत्मदहन करू, असा इशारा मालोजी भिताडे यांनी यावेळी बोलताना दिला.
बातम्या आणखी आहेत...