आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टँकर घोटाळ्याचा अहवाल मागवला : रुबल अग्रवाल

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - केडगाव शाळादुरुस्तीसह पारनेर तालुक्यात उघडकीस आलेल्या विविध घोटाळ्यांबाबत जिल्हा परिषद स्थायीच्या सभेत सदस्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी रुबल अग्रवाल यांच्यासह सर्वच अधिकार्‍यांना धारेवर धरले. टँकर घोटाळाप्रकरणी पुन्हा एकदा वस्तुनिष्ठ अहवाल मागवला असल्याचे अग्रवाल यांनी स्पष्ट केले.

जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विठ्ठल लंघे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेस उपाध्यक्ष मोनिका राजळे, सभापती कैलास वाकचौरे, शाहूराव घुटे, बाबासाहेब तांबे, सदस्य बाळासाहेब हराळ, सुजित झावरे, सत्यजित तांबे, अण्णासाहेब शेलार आदी उपस्थित होते.

जिल्हा परिषदेच्या केडगाव येथील शाळा दुरुस्तीत झालेला साडेआठ लाखांचा अपहार, पारनेर तालुक्यातील 72 लाखांचा टँकर घोटाळा, गारगुंडी येथील रोजगार हमी योजनेच्या रस्त्यातील गैरव्यवहार आदी प्रकरणांत झावरे यांच्यासह सर्वच सदस्यांनी मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांना धारेवर धरले. टँकर घोटाळाप्रकरणी पुन्हा एकदा वस्तुनिष्ठ अहवाल मागवला असल्याचे अग्रवाल यांनी स्पष्ट केले.

संगमनेर तालुक्यात अवघ्या 75 शाळांतच पर्जन्यमापक यंत्र बसवल्याबाबतही प्रश्न उपस्थित झाला. यावर अधिकारी निरुत्तरीत झाले. बसवण्यात आलेले पर्जन्यमापक कुठे आहेत, असाही सवाल सदस्यांनी केला. झावरे यांनी जिल्हा परिषद सीईओंची नाही, सदस्यांची आहे, असे सुनावले.

महापालिकेमुळे होणार्‍या प्रदूषणामुळे सीनाकाठची 17 गावे प्रदूषित झाली आहेत. यावर काय कारवाई केली, असा प्रश्न सभेत उपस्थित झाला. अकोले तालुक्यातील मैनखिंडवाडी, देवठाण येथील मीनादेवी मधुकर उपसा सिंचन योजनेसाठी 43 लाख 46 हजार रुपयांच्या कामास सभेत सुधारित प्रशासकीय मंजुरी देण्यात आली.