आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Water Tankers Provide To 24 Gaon Issue At Sangamner, Divya Marathi

संगमनेरमध्ये 24 गावांना टँकरने पाणी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
संगमनेर- जसजशी उन्हाची तीव्रता वाढत आहे, तशी पाण्याची पातळीही खोलवर जात असल्याने तालुक्याच्या अनेक भागात टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जातो. 24 गावे आणि त्याअंतर्गत येणार्‍या 146 वाड्यांना 35 टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे.

टंचाईस्थितीत आता प्रशासनाच्या कामाचा कस लागत असून टंचाई जाणवणार्‍या गावांत, वाडी-वस्तीवर तातडीने पाण्याचे टँकर पिण्यासाठी पाठवण्याची कसरत सुरू आहे. टंचाई परिस्थिती गंभीररित्या जाणवू लागल्याने टँकर मागणीचे प्रस्तावही पंचायत समिती, तहसीलदारांकडे दाखल होत आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी मात्र टंचाईस्थिती फारशी गंभीर दिसत नाही. टंचाईग्रस्त परिस्थितीवर मात करण्यासाठी गटविकास अधिकारी भुपेंद्र बेडसे, तहसीलदार शरद घोरपडे, पंचायत समितीचे उपसभापती बाळासाहेब गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली पुरेपूर प्रयत्न केले जात आहेत. टंचाईस्थितीत नागरिकांनी ओरड करू नये, यासाठी प्रशासनाने काळजी घेतल्याचे दिसते. तालुक्यातील बहुतांशी भागातून अद्याप पाण्यासाठी टँकरची मागणी होत नसल्याने समाधानकारक परिस्थिती आहे.

पंचायत समितीत टंचाई कक्ष स्थापन करण्यात आला असून तालुक्यातील अनेक पाणीयोजना सद्यस्थितीत बंद अवस्थेत आहेत. या योजनेवरील खर्च वाया जात असल्याचे दिसते. योजना पूर्ववत करण्यासाठी संबंधित अधिकार्‍यांकडून फारसे प्रयत्न होताना दिसत नाही. या योजनांचे काम पाहणारे अधिकारी सातत्याने वादग्रस्त ठरले आहे