आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विहिरीचा कठडा तुटून तीन मजुरांचा मृत्यू

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कर्जत - विहिरीचे काम चालू असताना कठडा तुटून तीन मजुरांचा मृत्यू झाल्याची घटना माहीजळगाव येथे गुरुवारी दुपारी अडीच वाजता घडली. मीनानाथ सुभाष देवकाते (26, सीतपूर), सीताराम लक्ष्मण इरकर (35) व कांतीलाल यादव इरकर (35, दोघे रा. वाघनळी) अशी मृतांची नावे आहेत.

माहीजळगाव येथून 1 किलोमीटर अंतरावर एका शेतात विहिरीचे खोदकाम चालू होते. विहिरीच्या एका बाजूचा कठडा तुटून खडक खाली कोसळल्याने तीन मजूर या ढिगार्‍याखाली अडकले. सीताराम इरकर व मीनानाथ देवकाते यांचा जागीच मृत्यू झाला, तर कांतीलाल गंभीर जखमी झाला. डॉ. राजेश तोरडमल, डॉ. शिवाजी राऊत व फारुक बेग यांनी विहिरीत उतरून जखमीवर प्रथमोपचार केले; परंतु उपचारासाठी रुग्णालयात नेत असताना कांतीलालचा मृत्यू झाला.

ढिगारा हटवण्यासाठी नगरहून दोन क्रेन तातडीने मागवण्यात आले. तथापि, सायंकाळी 6 पर्यंत मृतदेह बाहेर काढता आले नव्हते. विहीर अतिशय खोल असल्याने अडथळा येत होता. विहिरीत मोठे दगड पडले होते. आमदार प्रा. राम शिंदे यांच्यासह इतर पदाधिकार्‍यांनी तातडीने घटनास्थळी येऊन मदत केली.