आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

121 दिवस अखंड वाहणाऱ्या प्रवरेचे जलपूजन; शेकडो दिव्यांमुळे डोळ्यांचे फिटले पारणे...

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

संगमनेर- संगमनेरकरांसाठी प्रवरा नदी ‘अमृतवाहिनी’ म्हणून आेळखली जाते. बारमाही वाहणारी प्रवरा गेल्या काही वर्षांत मात्र सातत्याने कोरडीठाक असते. यावर्षी मात्र प्रवरेने सलग १२१ दिवस अखंड वाहण्याचा विक्रम केला. हे आैचित्य साधत भारतीय जनता पक्षाच्या वतीने प्रवरामाईचे जलपूजन केले. 


यावर्षी निसर्गाने पावसाचे भरभरून दान दिले आणि संगमनेरकरांची जीवनदायिनी असलेली अमृतवाहिनी प्रवरा जुलै महिन्यापासून सातत्याने गेले १२१ दिवस अखंड प्रवाहित आहे. अनेक वर्षांनी असा सुयोग जुळून आला. परमेश्वराने केलेल्या या प्रभूकृपेबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी संगमनेर भारतीय जनता पक्षातर्फे शनिअमावास्येचा पर्वकाळ साधत प्रवरा नदीचे जलपूजन करण्याचे ठरवण्यात आले. या कार्यक्रमाचे निमंत्रण सर्व संगमनेरकरांना पाठवण्यात आले. ज्येष्ठ नेते राम जाजू, तालुकाध्यक्ष काशिनाथ पावसे शहराध्यक्ष राजेंद्र सांगळे यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले. 


सरचिटणीस दिनेश सोमाणी यांनी प्रवरा नदीचे पौराणिक भौगोलिक महत्त्व विशद केले. अशोक सवरग्या शिंदे अमोल मच्छिंद्र शिंदे यांनी सपत्नीक नदीचे जलपूजन केले. वेदमंत्रांच्या घोषात पूजन करून नदीस साडीचोळी अर्पण केली. त्यानंतर उपस्थितांनी नदीत दीपद्रोण प्रवाहित केले. संधीकाळात नदीत प्रवाहित झालेल्या शेकडो दिव्यांमुळे उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फिटले. यावेळी भाजप महिला अध्यक्ष ज्योती भोर, नगरसेविका मेघा भगत, कांचन ढोरे, रेश्मा खांडरे, अपर्णा सांगळे, प्रीती सोमाणी, सारिका ओझा, नीता मोहरीकर, संगीता गवळी, सुरेखा खरे, रेणुका पोगुल, आरती ढोरे, मनीषा नेवासकर, मंजूषा फटांगरे, संगीता लांडगे, रुपाली दिड्डी, रीता कासट, लताबाई खुळे, वर्षा भोईर, सोनल रावल, सुरेखा कर्पे, ज्योती गुप्ता, विद्या जुंदरे, भारती शिंदे उपस्थित होत्या. 


चार नद्यांचा होते संगमनेरजवळ संगम 
प्रवरेच्याकाठावर इसवीसन पूर्व सुमारे दोनशे वर्षांपूर्वी मानवी वस्ती निर्माण झाली. त्यानंतर हळूहळू गाव आकाराला आले. गावाजवळून एक-दोन नव्हे, तर चार लहान-मोठ्या नद्यांचा संगम झाला आहे. संगमनेरच्या पश्चिमेला म्हाळुंगी आणि म्हानुटी नद्यांचा संगम झाला. म्हानुटीला आपल्या पोटात सामावून घेत म्हाळुंगी पुढे सरकते आणि पयोधरेला भेटते. संगमनेरच्या मानवी जीवनाला आकार देणारी पयोधरा पुढे आपल्या पोटात नाटकी नावाच्या छोट्याशा नदीला सामावून घेत पुढे जाते. पयोधरा म्हणजेच आजची प्रवरा नदी. ती येथील जनजीवन घडवत आहे. 

बातम्या आणखी आहेत...