आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुचाकी पेटवण्याचे लोण शेवगावातही

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शेवगाव - नाशिक, ठाणे, गडचिरोलीपाठोपाठ मोटारसायकली पेटवण्याचे लोण शेवगावातही पोहोचले आहे. शहरातील जुना प्रेस परिसरात राहणारे साईनाथ नामदेव भागवत यांच्या घराच्या पार्किंगमधील हीरो कंपनीची पॅशन प्रो व टीव्हीएस कंपनीची व्हेगा या सुमारे 1 लाख 12 हजार रुपये किमतीच्या दोन गाड्या पेटवण्यात आल्या. ही घटना सोमवारी पहाटे घडली. याच भागातील अँड. निखिल संतोषकुमार जाजू यांची बजाज कॅलिबर चोरट्यांनी लांबवली.

मोटारसायकलींच्या चोर्‍या आणि घरफोड्यांमुळे नागरीक त्रस्त झाले आहेत. एकही घरफोडी किंवा वाहनचोरीचा तपास पोलिसांना लावता आलेला नाही. सोमवारी पहाटे वाहने पेटवण्याचा प्रकार प्रथमच घडल्याने दुचाकीधारकांमध्ये घबराट निर्माण झाली आहे. पहाटे साडेतीनच्या सुमारास मोठा आवाज झाल्याने गल्लीतील नागरीक जागे झाले. मोटारसायकली पेटलेल्या पाहून त्यांनी तिकडे धाव घेतली. त्यांनी आग विझवली. नंतर पोलिसांनी पंचनामा केला. दोनच दिवसांपूर्वी पत्रकार संघातर्फे घरफोड्या व वाहनचोरी प्रकरणी पोलिसांच्या अकार्यक्षम कारभाराविषयी जिल्हा पोलिसांच्या दालनात भजन व ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला होता.