आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एकमेकांची संस्कृती समजावून घेणे गरजेचे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - इतर समाजाची संस्कृती समजावून घेणे आज अत्यंत आवश्यक झाले आहे. तसे होत नसल्याने इतर समाजाबद्दल मनात अनाठायी शंका निर्माण होतात. एकमेकांची संस्कृती समजण्यासाठी ईद मिलन कार्यक्रम पुलाचे काम करतो, असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते बहिरनाथ वाकळे यांनी केले.
रमजान ईदनिमित्त मखदूम एज्युकेशन अँड वेल्फेअर सोसायटी राजूभाई फ्रेंड सर्कलच्या वतीने गोविंदपुऱ्यात ईद मिलन कार्यक्रमात वाकळे बोलत होते. डॉ. कमर सुरूर यांनी प्रकाशित केलेल्या माहितीपत्रकाचे प्रकाशन यावेळी करण्यात आले. याप्रसंगी अनिस शेख, संतोष गुगळे, इक्बाल सय्यद, सैफ अली, शिवा भंडारी, राजू बोरा, अभिजित वाघ, आसिफ खान, अमान भैया, सुधीर मेहता, दीपक नेटके, नादिर खान, डॉ. परवेझ मणियार, युनूस तांबटकर, विठ्ठल बुलबुले, अशोककुमार बोगावत, शाकीर शेख, आबिद खान, रवींद्र सातपुते आदी उपस्थित होते.
यावेळी वाकळे म्हणाले, आज युवा पिढीमध्ये इतर समाजाबद्दल विष पेरण्याचे काम मोठ्या प्रमाणावर होत आहे. खरे-खोट्याचे ज्ञान नसल्यामुळे समाजा-समाजात भांडणे होऊन तेढ वाढू लागली आहे. या पार्श्वभूमीवर ईद मिलनसारख्या कार्यक्रमात सर्वांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन एकमेकांची संस्कृती जाणून घेतली, तर गैरसमज दूर होण्यास मोठी मदत होऊ शकेल. ईद मिलन हा केवळ उपचार राहता समाजात सद््भावना पसरवण्याचे साधन बनू शकेल.
प्रास्ताविकात राजूभाई यांनी समाजात एकोपा निर्माण करण्यासाठी वेगवेगळे उपक्रम राबवण्याची गरज असल्याचे सांगितले. डॉ. कमर सुरूर यांनी राष्ट्रीय एकात्मतेवर कविता सादर केल्या. डॉ. शमा यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्विततेसाठी मखदूम खान, मोईनोद्दिन शेख, जावेद शेख, नईम सरदार, हसरत खान, जिब्राईल शेख, फिरोज शेख, ताहेर खान यांनी परिश्रम घेतले.