आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विशाल गणेशच्या वेबसाइटचे उद्घाटन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर नगर शहराचे ग्रामदैवत असलेल्या विशाल गणपती मंदिराच्या वेबसाइटचे उद्घाटन उद्योगपती गोपाल धूत व रमाकांत व्यास यांच्या हस्ते झाले. ट्रस्टचे अध्यक्ष अभय आगरकर, उद्योजक विश्वनाथ पोंदे, मोहन मानधना, मधुसूदन मुळे आदी या वेळी उपस्थित होते.

विश्वशाली रिसर्च सेंटरचे अध्यक्ष अजिंक्य पोंदे व स्टार्क डिजिटल मीडियाचे सहसंस्थापक संजय मंगलारम यांनी ही वेबसाइट तयार केली आहे. नीलेश गिरमे, अमित बोरा, पत्रकार सचिन अग्रवाल यांचे सहकार्य त्यासाठी त्यांना मिळाले. अवघ्या पंधरा दिवसांत ही वेबसाइट त्यांनी बनवली. पुणे जिल्ह्यातील औसारी तालुक्यातील हरिहरानंदगिरी महाराजांची मुलाखत वेबसाइटवर अपलोड करण्यात आली आहे. या मुलाखतीत विशाल गणेशाच्या माहात्म्याविषयी त्यांनी माहिती सांगितली आहे.

संजय मंगलारम म्हणाले, विशाल गणपतीची माहिती भारतासह विदेशातील गणेशभक्तांना कळावी यासाठी ही वेबसाइट आम्ही तयार केली. मंदिराच्या बांधकामासाठी ऑनलाइन डोनेशनची सुविधा यामुळे उपलब्ध झाली आहे. विशालगणपती डॉटकॉम, र्शीविशालगणपती. ओराजे असा या वेबसाइटचा पत्ता आहे. या वेबसाइटच्या माध्यमातून भाविकांना देवस्थानशी संपर्कही साधता येऊ शकेल.