आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सव्वा रुपयात साधे चॉकलेट मिळणार नाही, पण थाटात लग्‍न लावले जाते, वाचा कुठे आणि कसे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - लग्न सोहळ्यात दागिने, बस्ता, मंगल कार्यालयाचं भाडं आणि जेवणावळीचा खर्च पेलताना कुटुंबांचे कंबरडे मोडते. पण नगर येथील श्रमिक बालाजी सामाजिक संस्थेने केवळ सव्वा रुपयात लग्न लावून देण्याची जबाबदारी स्वीकारली आहे. वधूचे मंगळसूत्र, वधू-वरांचा पोषाख आणि आलेल्या वऱ्हाडी मंडळींच्या भोजनाची व्यवस्था संस्थेतर्फे केली जाते. मागील वर्षांपासून संस्था हा उपक्रम राबवत आहे.
मुलाचे किंवा मुलीचे लग्न लावण्यासाठी मोठ्या प्रमाणात खर्च येतो, याची जाणीव ठेवून पालकांना सुरुवातीपासूनच पैशांची बचत करावी लागते. हा सारा अट्टहास केवळ प्रतिष्ठा जपण्यासाठी असतो. काही हौशी मंडळी अफाट खर्च करून लग्न संस्मरणीय करण्याचा प्रयत्न करतात. अशी लग्ने उच्चवर्गीय कुटुंबात पाहायला मिळतात. पण गरीब कुटुंबाच्या वधूसाठी मंगळसूत्र खरेदी करण्याएवढीही ऐपत नसते. बस्ता आणि आदरातिथ्य हे सोपस्कार पूर्ण करण्याची त्यांची हौस पूर्ण होत नाही. त्यासाठी सावेडीतील श्रमिक बालाजी सामाजिक संस्था मागील बारा वर्षांपासून सामुदायिक विवाह सोहळ्याचा उपक्रम राबवत आहे. हा उपक्रम सर्व समाजासाठी राबवला जातो. देणगीदारांचा त्यास मोठा प्रतिसाद मिळत आहे. वधू-वरांना आवश्यक लग्न साहित्य देण्यासाठी काही व्यावसायिकही पुढे आले आहेत. पुणे येथील पेशवे साडीवाले यांच्याकडून वधूसाठी साडी, तसेच साई ज्वेलर्सकडून मणिमंगळसूत्र मोफत दिले जाते. सुरेश बोज्जा यांच्याकडून नवरदेवाला पोषाख दिला जातो. या लग्नसमारंभात नावनोंदणी करण्यासाठी आई-वडिलांनी विवाहासाठी दिलेले संमतीपत्र, तसेच साक्षीदाराची गरज असते. २५ ऑगस्टला दुपारी वाजून १८ मिनिटांनी सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी १६ ऑगस्टपर्यंत श्रमिक बालाजी मंदिर देवस्थानात नावे नोंदवावीत, असे आवाहन संस्थेचे सहखजिनदार राजू गड्डम यांनी केले आहे.
पुढील स्‍लाईडवर क्‍लिक करून जाणून घ्‍या, कसा होतो लग्‍न सोहळा..