आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वेलनेस रिहॅब सेंटर बनले अनेक रुग्णांसाठी वरदान...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रतिनिधी - फिजिओथेरपी उपचारांनंतर रुग्णांच्या पुनर्वसनासाठी काम अत्यावश्यक असते. मात्र, त्याकडे दुर्लक्ष झाल्याने रुग्णांना फारसा फायदा होत नाही. ही गरज ओळखून डॉ. कृष्णगोपाल राजपूत यांनी वर्षभरापूर्वी वेलनेस रिहॅबची सुरुवात केली. जेमतेम खर्च भागला पाहिजे, इतकेच शुल्क आकारून रुग्णांना त्यांच्या पायावर उभे करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.
निखिल दळवी नऊ महिने घरीच अंथरुणावर खिळून होता. उपचारांसाठी झालेल्या खर्चाने मेटाकुटीला आलेल्या कुटुंबाला पुढील खर्च झेपण्यासारखा नव्हता. वेलनेस सेंटरचा लाभ झालेल्या रुग्णाकडून त्यांना पुनवर्सन केंद्राची माहिती मिळाली. महिनाभरापासून केंद्रात निखिलवर नाममात्र दरात उपचार सुरू आहेत. निखिल आज वॉकरच्या साह्याने स्वत:च्या पायांवर उभाच नाही, तर चालूही शकतो.

डॉ. गोपाल यांना अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. विलास डॉ. सोनल व्यवहारे या दाम्पत्याची मोलाची साथ मिळते. डॉ. बापूसाहेब कांडेकर न्युरोसर्जन डॉ. एम. ए. माजिद यांचे पाठबळ आहे. सावेडीतील गंगा उद्यानाशेजारी सुरुवातीला स्वत:चे क्लिनिक चालवताना डॉ. गोपाल यांना रुग्णांच्या अडचणी लक्षात आल्या पुनर्वसनासाठी एखादे केंद्र सुरू करण्याची निकड जाणवली. त्यांनी गुलमोहोर रस्त्याजवळील कोहिनूर मंगल कार्यालयानजीकच्या फडके मळा येथे पुनर्वसन केंद्र सुरू केले. सुरुवातीला रुग्णमित्रावरच त्यांनी उपचारपद्धतीचा उपयोग केला. सकारात्मक परिणामानंतर इतर रुग्णांच्या पुनर्वसनावर त्यांनी काम सुरू केले. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्यावर त्यांनी केलेले उपचार यशस्वी ठरले आहेत. गरज असणाऱ्या रुग्णांला डॉ. गोपाल यांच्याशी ७३५०१८०००१ या क्रमांकावर संपर्क साधता येईल.

सामाजिक बांधिलकी
औषधांबरोबरच पुनर्वसनासाठी योग्य मार्गदर्शन मिळणे आवश्यक आहे. ही गरज लक्षात घेऊन, तसेच सामाजिक बांधिलकीतून अल्पदरात हे पुनवर्सन केंद्र चालवत आहे.'' डॉ.कृष्णगोपाल राजपूत, संचालक.